जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'The Archies' साठी जबरदस्त मेहनत घेतेय शाहरुखची लेक, सुहानाचा Unseen फोटो VIRAL

'The Archies' साठी जबरदस्त मेहनत घेतेय शाहरुखची लेक, सुहानाचा Unseen फोटो VIRAL

'The Archies' साठी जबरदस्त मेहनत घेतेय शाहरुखची लेक, सुहानाचा Unseen फोटो VIRAL

बॉलिवूड (Bollywood) किंग शाहरुख खानची लेक (Shahrukh Khan Daughter) सुहाना (Suhana Khan) सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. सुहाना खान अलीकडे आपल्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 मे-  बॉलिवूड   (Bollywood)  किंग शाहरुख खानची लेक   (Shahrukh Khan Daughter)  सुहाना (Suhana Khan) सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. सुहाना खान अलीकडे आपल्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आली आहे. सुहाना सध्या 21 वर्षांची आहे. तिने नुकतंच आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. जोया अख्तर   (Zoya Akhtar)  दिग्दर्शित नेटफ्लिक्सच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘द आर्चीज’मधून (The Archies) ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. ज्यामध्ये सुहाना खानचा लुक आणि अभिनय पाहून चाहते आनंदी झाले आहेत.मीडिया रिपोर्टनुसार, सुहाना तिच्या पहिल्या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. सुहानाचा एक अनसीन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये सुहाना खान योगा करताना दिसून येत आहे. शाहरुख आणि गौरीच्या लेकीचा हा फोटो तिच्या फिटनेस ट्रेनरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. फोटोमध्ये सुहाना जिममध्ये दिसत आहे. ती काळ्या रंगाच्या पोशाखात योगा मॅटवर काकासन हा योग प्रकार करताना दिसत आहे. सुहानाने आपल्या बॉडीचा पूर्ण भार आपल्या दोन्ही हातांवर उचलला आहे. ती आपल्या शरीराचा समतोल उत्तम प्रकारे करताना दिसत आहे. नेहमीच आपल्या लुक्स मुळे चर्चेत राहिलेली सुहाना आता आपल्या फिटनेसमुळे सर्वांकडून वाहवा मिळवत आहे.

News18

फक्त फोटोच नव्हे तर त्याच्या कॅप्शननेसुद्धा नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सुहानाचा हा फोटो शेअर करत तिची ट्रेनर रुपल सिद्धपुरा फारियाने लिहिलंय की, “इथे प्रिय सुहाना काही क्लासेसमध्ये एकत्र #kakasanapose करत आहे. ती चॅम्पियन आहे. ती मॅटवर दिसते! गोड, तिखट आणि उबेर मस्त! नेहमी उपयुक्त आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी नेहमी तयार!”

News18

पुढे कॅप्शनमध्ये, ट्रेनरने सुहानाचे कौतुक करत तिला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रेनरने लिहिलंय, “सुहाना ऑन आणि ऑफ स्क्रीन दोन्ही प्रकारे तू खूप दयाळू आणि मोहक आहेस. तुला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. तू आपल्या ध्येयापर्यंत पोहोच. तुझ्यासाठी खूप खूप प्रेम.” असं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून सुहाना आणि तिच्या योग ट्रेनरमध्ये असलेलं बॉन्डिंग दिसून येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात