मुंबई, 02 जुलै- सध्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनस तुफान चर्चेत आहेत. प्रियांकाच्या दिराचं जो जोनसने प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नरशी ३० जूनला ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. यावेळी प्रियांका आणि निकही स्टायलिश अंदाजात दिसले. जो आणि सोफीच्या लग्नात सर्वात जास्त चर्चा होती ती प्रियांका चोप्राचीच. याचं कारणही खास होतं. ख्रिश्चन पद्धतीच्या या लग्नात प्रियांकाने चक्क साडी नेसली होती. सध्या तिचा भारतीय लुकमधला फोटो व्हायरल होत आहे. यातल्या एका फोटोमध्ये ती रडताना दिसत आहे. टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवर कमेंट करणं पडलं महाग, ट्रोल झाली अभिनेत्री रविवारी निकचा मोठा भाऊ जो ने पॅरिसमध्ये सोफीशी लग्न केलं. सेलिब्रिटींच्या या लग्नातले एकाहून एक सरस फोटो व्हायरल होत आहेत. त्यातील एका फोटोमध्ये प्रियांका थोडी भावुक झाली होती. प्रियांकाच्या एका फॅन अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. जोच्या लग्नात प्रियांका फार आनंदी असल्यामुळेच ती भावुक झाली होती. ते तर तिचे आनंदाश्रू होते. या फोटोमध्ये प्रियांका दोन्ही हातांनी अश्रू पुसताना दिसत आहे. निकही तिच्या शेजारी उभा आहे. दिराच्या ख्रिश्चन लग्नात प्रियांका साडी नेसेल अशी कोणी कल्पनाही केली नसेल प्रियांकाची ही साडी सब्यसाचीने डिझाइन केली होती. तर प्रियांकाच्या नवऱ्याने निक जोनसने मोठ्या भावाच्या लग्नात काळ्या रंगाच्या टस्कडोला पसंती दिली होती. रिंकूचे हे फोटो होतायेत व्हायरल, दिसते बोल्ड अँड ब्युटिफुल जो आणि सोफीने याआधीच फ्रान्समध्ये गुपचुप लग्न केलं होतं. या सीक्रेट लग्नाचेही अनेक फोटो व्हायरल झाले होते. यानंतर दोघांनी फान्स येथील सेरियन्समध्ये दुसऱ्यांदा लग्न केलं. चाहत्यांना या लग्नाची उत्सुकता फक्त प्रियांका चोप्रासाठी होती. ती या लग्नात कशी दिसेल.. तिचा लुक कसा असेल हेच प्रियांकाच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे होते. VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







