Home /News /entertainment /

Priyanka Chopra-Nick Jonas baby : अशी दिसते प्रियांका चोप्राची लेक? निक जोनाससोबत बाळाचा फोटो VIRAL

Priyanka Chopra-Nick Jonas baby : अशी दिसते प्रियांका चोप्राची लेक? निक जोनाससोबत बाळाचा फोटो VIRAL

Priyanka Chopra-Nick Jonas baby : हातात बाळाला घेतलेल्या निक जोनासचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हे बाळा प्रियांका चोप्राचं असल्याची चर्चा आहे.

    मुंबई, 24 जानेवारी : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा नवरा निक जोनास (Nick Jonas) यांच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वीच तिसऱ्या पाहुण्याची एंट्र झाली (Priyanka Chopra Nick Jonas baby photo) . सरोगसीच्या माध्यमातून दोघंही आई-बाबा झाले आहेत (Priyanka Chopra baby photo). त्यांनी एका मुलीला जन्म दिला आहे. ही गूड न्यूज मिळाल्यानंतर आता प्रियांका-निकच्या लेकीची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अशाच निक जोनासोबत एका बाळाचा फोटो व्हायरल झाला आहे. 22 जानेवारीला प्रियांका-निकने सर्वांना गूड न्यूज दिल्यानंतर त्यांचे काही फोटो, व्हिडीओही सोशल मीडयावर व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हायरल फोटोने सर्वांचं लक्ष वेधलं आहेत. ज्यात निकच्या कुशीत एक बाळ आहे. निक त्याच्या डोक्यावर गोड पापा देतानाही दिसतो आहे.हा फोटो पाहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होतो आहे.  निकच्या हातातील हे बाळ म्हणजे त्याची आणि प्रियांकाची मुलगी असल्याची चर्चा होते आहे. हे वाचा - घडाघडा इंग्रजी बोलणारी कतरिना कैफ किती शिकली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? पण खरंतर निकचा हा फोटो खूप जुना आहे. या फोटोत दिसणारं बाळ हे त्याचं आणि प्रियांकाचा बाळ नाही आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये प्रियंका चोप्राने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर लगेच सरोगसीद्वारे आपण आई झाल्याचे प्रियंकाने जाहीर केले. “आम्ही नुकतेच बाळाचे स्वागत केल असून आम्ही खूप आनंदी आहोत. सध्या आम्ही आमच्या कुटुंबाकडे लक्ष केंद्रित करत आहोत. त्यामुळे अशा विशेष क्षणी आम्हाला खासगीपणा जपण्याची गरज आहे,” असे प्रियंकाने इन्स्टाग्रामद्वारे सांगितले. हे वाचा - Pushpa फेम रश्मिकाने प्रमोशनसाठी नेसलेल्या या साडीची किंमत वाचून बसेल धक्का एका नव्या माहितीनुसार, प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांना त्यांच्या कुटुंबात दोन मुलं हवी आहेत. यूएस वीकलीशी बोलताना प्रियंका आणि निकच्या जवळच्या मित्राने यासंदर्भात खुलासा केला. प्रियांका आणि निक यांना "किमान दोन मुले" हवी आहेत. अशी माहिती जवळच्या मित्राने दिली. त्यामुळे दोघे लवकरच आपल्या चाहत्यांना पुन्हा गूड न्यूज देतील अशी चर्चा सिनेसृष्टीत रंगली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Entertainment, Nick jonas, Priyanka chopra

    पुढील बातम्या