Home /News /entertainment /

घडाघडा इंग्रजी बोलणारी कतरिना कैफ किती शिकली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

घडाघडा इंग्रजी बोलणारी कतरिना कैफ किती शिकली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

Katrina Kaif

Katrina Kaif

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचं (Katrina Kaif) नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. लाखो चाहते कतरिनाच्या सौंदर्यावर आणि तिच्या स्टाईलवर फिदा आहेत. पण सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी कतरिना कैफ किती शिकली आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 24 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे (Katrina Kaif) लाखो फॅन्स आहेत. तिने डिसेंबर महिन्यात अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) लग्न केलं. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असल्याचंही म्हटलं जातं. बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट  देणारी कतरिना किती शिकलेली आहे, तिचं शिक्षण (education) किती झालंय हे माहीत आहे का?, नसेल माहीत तर ही बातमी वाचाच. चित्रपटांमध्ये इतकं उत्तम इंग्लिश बोलणारी कतरिना कैफ कधीच शाळेत (school) गेलेली नाही, असं आम्ही सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. कतरिना कधीच शाळेत गेलेली नाही. तिचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटिश व्यापारी होते, तर आई सुझान ब्रिटिश नागरिक आहे. कतरिना लहानपणी कधीच शाळेत गेली नाही. कारण तिचे बालपण जवळपास १८ देशांमध्ये गेलं. कायम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागत असल्याने तिला शाळेत जाता आलं नाही. तिचं शिक्षण घरूनच झालंय. तिची आई ब्रिटिश असल्याने कतरिनाचे इंग्रजी (English) चांगले आहे. यासंदर्भात ‘राजस्थान पत्रिका’ने वृत्त दिलंय. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी कतरिना कैफने मॉडेल (model) म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. काही वर्षांनी कतरिना मुंबईत आली आणि तिने येथेही आपले मॉडेलिंग करिअर सुरू ठेवले. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. गेल्या अनेक वर्षांपासून ती बॉलिवूडमध्ये काम करत आहे. तिने अनेक हिट चित्रपट देखील दिले. परंतु गेल्या काही महिन्यांपासून कतरिना चर्चेत आहे ती तिच्या आणि विकी कौशलच्या लग्नामुळे. 9 डिसेंबर रोजी कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचा शाही विवाह सोहळा राजस्थानमधील (Rajasthan) सवाई माधोपुरमध्ये पार पडला. त्यानंतर दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करत या संदर्भातील माहिती दिली होती. दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यांच्या लग्नाला दोघांच्याही घरचे नातेवाईक आणि काही निवडक मित्रमंडळी उपस्थित होती. दरम्यान, विकी कौशल सध्या इंदूरमध्ये सारा अली खानसोबत त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. चित्रपटाच्या सेटवरील या दोघांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर कतरिना देखील तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून (social media) शेअर करत असते. तुम्हाला लक्षात आलं असेल तुमच्या लाडक्या अभिनेत्रीचं शिक्षण किती झालंय. पण तिनी तिच्या कौशल्यावर एवढं मोठं स्थान पटकावलं आहे त्यामुळे तिचं कौतुक करणं गरजेचं आहे.
    First published:

    Tags: Bollywood actress, Katrina kaif, Vicky kaushal

    पुढील बातम्या