OMG! वाढदिवसाला या अभिनेत्रीने फक्त शर्ट घालून केला फोटो पोस्ट; म्हणाली, 'मी खूप सुंदर'

OMG! वाढदिवसाला या अभिनेत्रीने फक्त शर्ट घालून केला फोटो पोस्ट; म्हणाली, 'मी खूप सुंदर'

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने मंगळवारी (Urvashi Rautela) तिचा 25वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान स्वत: उर्वशीने इन्स्टाग्रामवर Birthday Special पोस्ट केली आहे.

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने मंगळवारी (Urvashi Rautela) तिचा 25वा वाढदिवस साजरा केला. तिच्यावर तिच्या अनेक फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान स्वत: उर्वशीने इन्स्टाग्रामवर Birthday पोस्ट केली होती आणि तिच्या चाहत्यांनी सरप्राइज दिलं आहे. या पोस्टमध्ये उर्वशी अत्यंत बोल्ड अंदाजात दिसली आहे. उर्वशी तिच्या इन्स्टाग्रामवर अनेकदा फोटो शेअर करत असते. तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती फॅन्समध्ये कायम चर्चेत असते. दरम्यान तिने तिच्या वाढदिवशी स्वत:चं कौतुक करणारी फोटो अपलोड केला आहे.

(हेही वाचा-सलमान खान बांधणार पूरग्रस्तांसाठी घरं, कोल्हापुरातील 'खिद्रापूर' गाव घेतलं दत्तक)

उर्वशी रौतेलाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने ब्राऊन रंगाचा शर्ट घातला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे की, "आज सूर्य इतर दिवसांपेक्षा जास्त चमकत आहे. दुनियेतील सर्वात खास व्यक्तीला अर्थात मला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मला एवढ्या साऱ्या शुभेच्छा देण्यासाठी धन्यवाद. माझ्या वाढदिवशी सुट्टी जाहीर करण्यात यावी.” असं मोठं कॅप्शन देत उर्वशीने स्वत:चं कौतुक केलं आहे.

उर्वशीचा जन्म 25 फेब्रुवारी 1994 ला हरिद्वारमध्ये (Haridwar) झाला होता. मॉडेल म्हणून तिने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर तिने 2013 मध्ये सनी देओलच्या 'सिंह साहब द ग्रेट' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या सिनेमांपेक्षा इतर अनेक गोष्टींमुळे चर्चेत असते. उर्वशी सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. ती इन्स्टाग्रामवर देखील तिचे फिटनेसचे व्हिडीओ पोस्ट करत असते. उर्वशीचे 'बोल्ड' फोटो नेहमी व्हायरल होत असतात.

First published: February 26, 2020, 8:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या