जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Priyanka Chopra birthday: प्रियांका चोप्राने लग्नाच्या वेळी का जप्त केलेले पाहुण्यांचे मोबाईल फोन; काय आहे ही भानगड?

Priyanka Chopra birthday: प्रियांका चोप्राने लग्नाच्या वेळी का जप्त केलेले पाहुण्यांचे मोबाईल फोन; काय आहे ही भानगड?

Priyanka Chopra birthday: प्रियांका चोप्राने लग्नाच्या वेळी का जप्त केलेले पाहुण्यांचे मोबाईल फोन; काय आहे ही भानगड?

प्रियांका चोप्रा या अभिनेत्रीने निक जोनस थाटामाटात विवाह केला. लग्नाच्या दिवशी आलेल्या पाहुण्यांचे फोन तिने जप्त केले होते. याबद्दलचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 17 जुलै: बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा चाळीशीत पदार्पण करत आहे. चाळीशीच्या घरात पोहोचलेली ही अभिनेत्री आज सुद्धा तितकीच फिट अँड फाईन आहे. प्रियांका प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करते आणि त्यामुळेच ही अभिनेत्री आजही बॉलिवूडमध्ये अग्रगण्य स्थानी टिकून आहे. प्रियांका निक जोनस सोबत झालेल्या विवाहानंतर बरीच चर्चेत आली होती. (Priyanka Chopra Nick Jonas wedding memories) प्रियांकाने लग्नाच्या वेळी आलेल्या पाहुण्यांचे फोन जप्त केले होते हे माहित आहे का? प्रियांकाने जोनस ब्रदर्सपैकी चाहत्यांच्या लाडक्या असणाऱ्या निकसोबत 2018 मध्ये विवाह केला. त्यावेळी त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. प्रियंकाने कॉफी विथ करण या शोमध्ये तिच्या लग्नाचा एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. तिने लग्नाला आलेल्या पाहुण्यांचे फोन का जप्त केले याबद्दल ती बोलताना दिसली होती. “आजकालच्या काळात प्रत्येकाकडे हातात मोबाईल असतोच. माझ्या लग्नाच्यावेळी अक्षरशः आम्ही आलेल्या पाहुण्यांचे फोन जप्त केले होते. आम्ही आलेल्या सगळ्या पाहुण्यांना एक झिप असलेली पिशवी दिली होती. त्यामध्ये फोन टाकून सगळ्यांचे फोन आम्ही जमा केले होते. तुम्हाला फोन अनलॉक करायचा असेल तर तुम्हाला येऊन त्या छोट्या पिशवीतून काढून मगच अनलॉक करता येईल अशी सोया आम्ही केली होती. मोबाईल पोलीस स्टॅन्ड आम्ही लग्नात ठेवला होता. कारण हल्लीच्या काळात इंटरनेटवर असणारी एक एक गोष्ट अनंत काळापर्यंत तशीच राहते आणि एकदा तशी ओळख निर्माण झाली तर खूप समस्या होऊ शकतात. असं लग्नात केलं नसतं तर लग्नातले अगदी चित्रविचित्र पोज मधले हललेले फोटोसुद्धा पोस्ट झाले असते आणि असं करणं योग्य ठरलं नसतं. यासाठी आम्ही ही खास काळजी घेतली.” असं प्रियांका सांगते. सध्याच्या काळात कलाकारांवर असलेलं लक्ष आणि डिजिटलच्या जमान्यात आलेली सहजता बघता काही गोष्टींवर मर्यादा घालण्यासाठी लग्नात प्रियंकाने ही युक्ती वापरल्याचं तिने कार्यक्रमात सांगितलं आहे.

जाहिरात

प्रियांका आणि निक यांचं लग्न चाहत्यांसाठी आनंदाचा विषय ठरलं होतं. प्रियांकाने दोन्ही पद्धतीने लग्न केलं होतं. व्हाईट वेडिंग म्हणजे vows ची देवाण घेवाण करत ख्रिस्ती पद्धतीने लग्न केलं होतं. हे ही वाचा-  Priyanka Chopra birthday: बॉलिवूडच्या यंग अभिनेत्रींपेक्षा जास्त कमावते प्रियांका, PC चं नेटवर्थ किती आहे? यामध्ये ती व्हाईट गाऊनमधे दिसून आलेली तर हिंदू पद्धतीने अगदी डोक्यापासून पायापर्यंत देसी लुक करत ही देशी गर्ल कलरफुल अंदाजात बोहल्यावर चढली होती. लग्नाबद्दल तिला लहानपणीपासून आकर्षण आहे असं तिने कॉफी विथ करणच्या मंचावर सांगितलं होतं. तसंच निक आणि तिच्या प्रपोजलबद्दल सुद्धा ती यात बोलताना दिसून आलेली. सध्या प्रियांका तिचं आईपण एन्जॉय करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात