न्यूयॉर्क, 10 जून- बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला आज तिच्या वडिलांची फार आठवण येतेय. अनेक चांगल्या प्रसंगी प्रियांकाला तिच्या वडिलांची आठवण आवर्जुन येते. याबद्दल ती स्वतः सोशल मीडियावर व्यक्तही होते. नुकतंच तिने वडिलांसोबतचा एक जुना फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती झाडावर चढली आहे तर प्रियांकाचे बाबा तिच्या बाजूला उभे आहेत. हा फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले की, ‘तुम्हाला जाऊन सहा वर्ष झाली. पण असं वाटतं ही काल परवाच मी तुम्हाला गमावलं. मी तुम्हाला दररोज मिस करते बाबा.’
‘या’ मराठमोळ्या कलाकाराची पत्नी आजही करते घरकाम
तिच्या या फोटोवर हार्टवालं इमोजी टाकत कमेंट केली. त्याच्या या इमोजीवाल्या कमेंटवरच सुमारे ७ हजारांहून अधिक लोकांनी कमेंट केली आहे. तर प्रियांकाच्या सासऱ्यांनीही तिच्या या फोटोवर कमेंट केली आहे. पापाजोनस या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांनी ही कमेंट केली. ‘प्रेमळ सुनेला खूप सारं प्रेम. या जगात कोणीही त्या खास व्यक्तिची जागा घेऊ शकत नाही. पण तुला भरभरून प्रेम आणि पाठिंबा देण्यासाठी आम्ही आहोत.’
प्रियांकाच्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअरही केलं. अनेकांनी प्रियांकासोबत त्यांचे अनुभवही शेअर केले. सध्या प्रियांका चोप्रा तिच्या आगामी द स्काय इज पिंक सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम दिसणार आहेत.
सर्जरीनंतर अशक्त झाल्या तनुजा, काजोलने शेअर केली भावुक पोस्ट!
VIDEO : पुण्यात मुसळधार; अनेक रस्त्यांवर साचलं पाणी