मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO : नाटक का लांबतं?... प्रिया बापटने सांगितलेलं कारण ऐकून हसून व्हाल लोटपोट

VIDEO : नाटक का लांबतं?... प्रिया बापटने सांगितलेलं कारण ऐकून हसून व्हाल लोटपोट

प्रिया बापट

प्रिया बापट

नुकतीच प्रिया बापटनं झी मराठीवरील 'बस बाई बस' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. कार्यक्रमात सुबोध भावेनं प्रियाला तिच्या नाटकाबद्दल एक प्रश्न विचारला. यावेळी प्रियाने नाटकाचा प्रयोग सुरू असताना तिच्याबरोबर घडलेला एक मजेशीर किस्सा सांगितला.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 1 ऑक्टोबर :   झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा कार्यक्रम 'बस बाई बस' सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध महिला सहभागी होतात. त्या व्यक्तिगत आयुष्यातील धमाकेदार किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतात. प्रेक्षक सुद्धा ते एन्जॉय करतात. नुकतीच प्रिया बापटनं झी मराठीवरील 'बस बाई बस' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. प्रियानं यावेळी अनेक धम्माल किस्से सांगितले. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी अभिनेत्री प्रिया बापट ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रिया ही तिच्या बिनधास्त आणि हटके अभिनयासाठी ओळखली जाते. फक्त अभिनय नाही तर तिच्या सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. मालिका, चित्रपट याबरोबरच प्रियाने नाटकांतही काम केलं आहे. कार्यक्रमात सुबोध भावेनं प्रियाला तिच्या नाटकाबद्दल एक प्रश्न विचारला. यावेळी प्रियाने नाटकाचा प्रयोग सुरू असताना तिच्याबरोबर घडलेला एक मजेशीर किस्सा सांगितला.

हेही वाचा - Bigg boss marathi 4 : प्रेक्षकांची लाडकी शेवंता दिसणार बिग बॉसच्या घरात; प्रोमो पाहून चाहत्यांनी लावला अंदाज

सुबोध भावेनं प्रियाला 'कलाकार कधी वाक्य विसरतात. कधी जास्तीची वाक्य घेतात, यामुळे बऱ्याचदा नाटक लांबतं. अडीच तासाचं नाटक कधीकधी तीन तासाचं होतं. पण या व्यतिरिक्तही काही कारणांमुळे नाटक लांबलेलं मी ऐकलं आहे. नेमंक काय घडलं होतं?', असा प्रश्न त्यानं विचारला. सुबोधनं विचारलेला प्रश्न ऐकताच प्रियाला तिच्याबरोबर घडलेला किस्सा आठवला. किस्सा शेअर करत ती म्हणाली, 'उमेश कामत, मी आणि हेमंत ढोमे ’नवा गडी नवं राज्य’ हे नाटक करायचो. पुण्यातील एका प्रयोगाला हा किस्सा घडला. नाटकात एका सीनमध्ये मी रंगमंचावरून बाहेर गेल्यावर हेमंत-उमेशचं संभाषण सुरू असतं आणि त्यांच्या काही वाक्यानंतर माझी पुन्हा एन्ट्री होते. प्रयोग सुरू असताना नाटकातील त्या सीनला मी विंगेत(रंगमंचाबाहेर) गेले आणि माझ्या लक्षात आलं की मला लघुशंका आली आहे. पुढे मला संपूर्ण नाटक करायचं होतं. त्यामुळे मी विंगेतून हेंमत आणि उमेशला खुणावून सांगितलं की तुम्ही संभाषण चालू ठेवा. मी पटकन जाऊन येते.'

'हेंमत आणि उमेशनं मी येईपर्यंत संभाषण सुरू ठेवलं होतं. मी पटकन धावत गेले आणि आल्यानंतर त्यांना विंगेतून खुणावलं. मी आले आहे. आता तुम्ही शेवटचं वाक्य घ्या म्हणजे मला पुन्हा रंगमंचावर एन्ट्री घेता येईल', प्रियानं हा किस्सा सांगताच सुबोधलाही हसू आवरलं नाही. तो पुढे म्हणाला, 'बरेचसे कलाकार असे असतात जे नाटकाची तिसरी घंटा व्हायच्या आधी बाथरूमजवळ सापडतात. नाटक सुरू व्हायच्या आधी त्यांना प्रेशर आलेलं असतं. पण यावरूनच कलाकारांची त्यांच्या कामावर, नाटकावर असलेली श्रद्धा दिसून येते.'

झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा कार्यक्रम 'बस बाई बस' सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे सांभाळत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला या कार्यक्रमात सहभागी होत असलेल्या पहायला मिळतात. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना सुबोध भावे निरनिराळे प्रश्न विचारतात. दरम्यान, आगामी भागाच्या या प्रोमाने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं असून प्रेक्षकांची उत्सुकताही वाढवली आहे. त्यामुळे प्रिया सोबत सुबोध भावे काय गप्पा मारणार आणि कोणते प्रश्न विचारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Marathi actress, Zee Marathi, Zee marathi serial