मुंबई 13 जुलै: अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat funny reel) सध्या बरीच चर्चेत असते. प्रियाने अनेकवर्ष मेहनत करून इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली. या अनेकवर्षात प्रियाने प्रेक्षकांचं प्रेम, प्रसिद्धी सगळंच कमावलं आहे. असं असलं तरी आज तिच्यावर रडायची वेळ आली आहे. प्रियाने तिच्या नव्या रिलमध्ये याबद्दल सांगितलं आहे. प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती कधी वेगवेगळ्या फोटोशूट मुळे तर कधी फनी व्हिडिओ आणि रील शेअर करून चाहत्यांचं मन जिंकत असते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या रीलची बरीच चर्चा होत आहे. त्याहून जास्त त्यावर तिच्या नवऱ्याने दिलेल्या प्रतिक्रियेला चाहत्यांनी डोक्यावर चालून धरलं आहे. प्रिया या रिलमध्ये सांगते, ‘देवाने दिलेलं सगळं माझ्याकडे आहे…. पण… ते ठेवलंय कुठे हेच माझ्या लक्षात नाहीये.” प्रियाने शेअर केलेल्या या विनोदी रीलमुळे आता चाहत्यांना हसू आवरणं कठीण झालं आहे. विसराळूपणाची इतकी हद्द या अभिनेत्रीने केल्याने अनेकांचे हसून बेहाल झाले आहेत. या रीलमध्ये प्रिया बॅगेत सामान शोधताना दिसत आहे. त्यावर तिचा नवरा उमेश कामत (Umesh Kamat reaction on Priya bapat reel) रिऍक्ट होत लिहितो, “मी तर घरी आहे प्रिया” त्याच्या या भन्नाट उत्तरावर चाहत्यांनी त्याला दाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. **हे ही वाचा-** Hruta Durgule: हृताने सोडलं मोठं प्रोजेक्ट; ही अभिनेत्री घेणार तिची जागा “त्यावर सलमान खानच्या अंदाजात ‘उमेश समझ में आता है पर्स में नहीं’ अशा प्रतिक्रिया देत चाहत्यांनी धमाल उडवून दिल्याचं पाहायला मिळत आहे. प्रिया आणि उमेश हे क्युट कपल बरीच धमाल करताना दिसतं. या कपलने अनेकदा आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओ आणि पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
वर्क फ्रंटवर सुद्धा हे दोघे उत्तम काम करत आहेत. उमेशच्या दादा एक गुड न्यूज आहे नाटकाचे बरेच प्रयोग होत आहेत. या नाटकातून हृता दुर्गुळेने एक्झिट केल्यानंतर नव्या तरुण अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. तर प्रियाचा नवा प्रोजेक्ट कोणता असेल याबद्दल उत्सुकता निर्माण होताना दिसत आहे.