मुंबई 13 जुलै: अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या मालिका आणि सिनेमांमध्ये गाजताना दिसत आहे. हृता एकाच वेळी दोन सिनेमे मालिका आणि नाटकात दिसून येत होती. पण तिच्या करिअरमध्ये तिला बरीच लोकप्रियता मिळवून देणाऱ्या नाटकातून हृता एक्झिट घेणार असल्याचं समोर येत आहे. हृताने ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटक (Hruta Durgule exit from Dada Ek Good News Aahe) सोडल्याची बातमी समोर येत आहे. आणि तिच्याऐवजी एक तरुण अभिनेत्री मृगा बोडस आता हृताची जागा घेणार असल्याचं समोर येत आहे. ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटक त्याच्या सुंदर विषयासाठी आणि त्याच्या कमाल मांडणीसाठी ओळखलं जातं. या नाटकात भाव बहिणीचं सुंदर नातं आणि त्यांची गोड गोष्ट दाखवण्यात आली आहे. हृतां दुर्गुळे सह उमेश कामत, आरती मोरे आणि आशुतोष गोखले हे नाटक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात असं अनेकांचं म्हणणं आहे. हृताचं या नाटकातील काम प्रेक्षकांकडून तसंच यंग जनरेशनकडून सुद्धा खूप पसंत केलं जात होतं. तिने नाटक सोडल्याचं ठोस कारण अजून समोर आलं नाहीये. हृताची जागा आता अभिनेत्री मृग बोडस (Mruga Bodas) घेताना दिसणार आहे. मृगाने याआधी ‘धनंजय माने इथेच राहतात का’ नाटकात काम केलं आहे तसंच तिने स्वराज्यरक्षक संभाजी या गाजलेल्या मालिकेत ताराबाईंची भूमिका साकारली होती. मृगा सध्या या रोलसाठी खूप मेहनत घेताना दिसून येत आहे. हे ही वाचा- अस्सल मराठमोळ्या लुकमध्ये संस्कृती पोहोचली तुळजापूरला, झकास फेट्यामधले photo पाहा वर्क फ्रंटवर सांगायचं तर ऋता दुर्गुळे सध्या अनन्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तसंच तिचा टाईमपास 3 हा सिनेमा सुद्धा येत्या महिन्याच्या शेवटी रिलीज होणार आहे. हृता काम करत असलेली प्रसिद्ध मालिका ‘मन उडू उडू झालं’ सुद्धा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हृताने दोन कलाकृतींमधून एकाच वेळी निरोप घेतल्याने सध्या चर्चाना उधाण आलं आहे. मन उडू उडू झालं मालिकेचा सुद्धा ट्रॅक आता शेवटाकडे येताना दिसत आहे.
या मालिकेची लोकप्रियता आणि टीआरपी जास्त असताना सुद्धा मालिकेने असं निरोप घेणं चाहत्यांना निराश करणारं आहे अशी प्रतिक्रिया समोर येत आहे. आता या प्रसिद्ध नाटकातून सुद्धा तिने एक्झिट घेतल्याने चाहत्यांची प्रतिक्रिया काय येते हे पाहावं लागेल.
‘दादा एक गुड न्यूज’ आहे या नाटकाबद्दल सांगायचं झालं तर या नाटकाने नुकताच 250 प्रयोगांचा टप्पा पूर्ण केला आहे. या नाटकाची गॅंग एकत्र येऊन बरीच धमाल करताना दिसते. या नाटकाचा दुबई दौरा सुद्धा नुकताच पार पडला.