जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / City Of Dreams Season 2 मधून सिद्धार्थ, प्रिया बापट, अतुल कुलकर्णी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

City Of Dreams Season 2 मधून सिद्धार्थ, प्रिया बापट, अतुल कुलकर्णी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

city of dreams

city of dreams

City of Dreams या वेबसीरिजचा पहिला सीझन प्रिया बापटच्या बोल्ड सीन्समुळे गाजला होता. आता लवकरच या सीरिजचा पुढचा सीझन प्रदर्शित होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 फेब्रुवारी: गेल्या वर्षी सर्वात चर्चेत राहिलेली वेब सीरीज म्हणजे ‘ City of Dreams’. राजकीय घराण, त्या कुटुंबातील दोन राजकीय वारसदार आणि त्यांच्यामधली राजकीय चढाओढ या  संघर्षाने अनेकांची मन जिंकली. प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर आणि अतुल कुलकर्णी ह्यांची मुख्य भूमिका असलेल्या या वेब सीरीज चा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रिया बापटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ह्याबाबत अधिक माहिती दिली आहे. प्रियाने लिहिलंय की, ‘ सिटी ऑफ ड्रीम्स सीजन 2’ चं शुटींग संपलेलं आहे. आम्ही लवकरच आपल्याला भेटायला येऊ. ! खरंतर 90 दिवसांमध्ये पुर्ण होऊ शकणार शुटींग  376 दिवस चाललं आहे. आणि ह्यामुळे एका वेगळ्याच प्रकारे आम्ही 2020 च्या आमच्या आशा जिवंत ठेवू शकलो. एका खुप छान टीम बरोबर काम करण्याची आणि नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली म्हणुन खूप खूप धन्यवाद! लवकरच स्क्रीन वर भेटू ! ‘

जाहिरात

हे देखील वाचा -  Oscars 2021: सिनेरसिकांची निराशा, भारतीय सिनेमा ‘जल्लीकट्टू’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

प्रिया या वेब सिरीजमध्ये ‘पूर्णिमा गायकवाड’ च्या व्यक्तिरेखेत पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला येणार आहे. मागच्या सीजन मध्ये शांत, संयमी आणि प्रभावी व्यक्तिमत्वाच्या पूर्णिमाची राजकारणात एन्ट्री दाखवली गेली होती. आता या सीजन मध्ये पूर्णिमाचा राजकारणातला प्रवास आपल्याला लवकरच पहायला मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात