मुंबई, 26 नोव्हेंबर : मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट सतत चर्चेत असते. प्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्यामुळे ती चाहत्यांसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अनेकदा ती तिचा नवरा उमेश कामतसोबतचे फोटो शेअर करत असते. दोघांचे फोटो सोशल मीडियावर काही क्षणातच व्हायरल होतात. नुकताच प्रियाने उमेशसोबत नवीन फोटो शेअर केलाय आणि नेहमीप्रमाणे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
प्रिया बापटने तिच्या इन्स्टाग्रामवर उमेश कामतसोबतचा एक रोमॅंन्टिक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये प्रियाने उमेशला घट्ट मिठी मारल्याचं दिसतंय. या फोटोसोबत तिने कॅप्शन लिहिलंय की, 'सुकून'. या फोटोवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. 'लव्ह यू बोथ, तुम्ही दोघे खूप क्यूट आहात, लव्ह, फेव्हरेट कपल,' अशा अनेक कमेंट चाहते पोस्टवर करत आहेत. त्यांची ही पोस्ट सध्या सगळ्यांचं लक्ष वेधत आहे.
हेही वाचा - सलमान खान करतोय 'या' अभिनेत्रीला डेट?; राखी सावंतने केलं गुपित उघड
मराठीतील लोकप्रिय जोड्यांपैकी उमेश-प्रियाला ओळखलं जातं. त्यांचे अनेक चाहते आहेत. उमेश कामत आणि प्रियाच्या कपल गोल्सनाही नेटकरी चांगलाच प्रतिसाद देत असतात. तब्बल 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी 2011 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांची लवस्टोरीही फारच फिल्मी आहे.
View this post on Instagram
दरम्यान, प्रियानं अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. त्याचबरोबर ती हिंदी वेबसिरिजमध्येही झळकली आहे. त्यामुळे प्रियाचा चाहता वर्ग काही कमी नाही. तिनं तिच्या अभिनयानं चाहत्यांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयासोबत प्रिया तिच्या हटके फॅशनमुळेही चर्चेत असते. नेहमीच वेगळ्या लूकमध्ये ती फोटो पोस्ट करुन चाहत्यांना घायाळ करत असते.
प्रियाला फिटनेसचही खूप वेड आहे. प्रिया जेवढी तिच्या कामविषयी चर्चेत असते तेवढीच ती तिच्या फिटनेसविषयीही चर्चा होत असते. ती फिटनेसविषयीही खूप जागरूक आहे. ती सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते ज्यामध्ये ती तिच्या फिटनेस दाखवत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.