मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Priya Bapat & Umesh Kamat: उमेश-प्रिया या cute couple च्या लव्हस्टोरीमध्ये 9 आणि 18 तारखेचं काय आहे खास महत्त्व?

Priya Bapat & Umesh Kamat: उमेश-प्रिया या cute couple च्या लव्हस्टोरीमध्ये 9 आणि 18 तारखेचं काय आहे खास महत्त्व?

मराठीतील अनेक गोड जोडप्यांपैकी पैकी सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेली एक जोडी अर्थात (Umesh Kamat Priya Bapat) उमेश कामत आणि प्रिया बापट. त्यांच्या नात्याला एवढी वर्ष झाली त्यांचं वाढत जाणारं प्रेम हे त्यांच्या सुखी आयुष्याचं रहस्य आहे. पण उमेश प्रियाच्या लव्हस्टोरीमध्ये काही तारखांना खूप जास्त महत्त्व आहे. काय आहे ही भानगड?

पुढे वाचा ...

मुंबई 4 जून: उमेश कामत आणि प्रिया बापट (Umesh Kamat Priya Bapat couple)हे गोंडस कपल सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम प्रेक्षकांना सुद्धा आवडतं. कोणत्याही इतर नॉर्मल जोडप्यांपेक्षा या दोघांमध्ये असं काही खास आहे ज्यामुळे ते 10 वर्षाहून अधिक काळ एकमेकांसोबत आहेत. प्रत्येक कलाकाराच्या करिअरमध्ये काम करताना त्यांच्या तारखांना खूप महत्त्व असतं. एखादी तारीख इकडे तिकडे झाली तरी घोळ होतात. मात्र या कपलच्या लव्हस्टोरीमध्ये सुद्धा काही ठराविक तारखांना विशेष महत्त्व आहे.

प्रिया आणि उमेश यांची लव्हस्टोरी (Umesh-Priya lovestory )खूप भन्नाट आहे. प्रिया कॉलेजमध्ये असताना ती उमेशच्या प्रेमात पडली हे तिने अनेकदा अनेक मुलाखतीत सांगितलं आहे. उमेशचं हँडसम रूप बघता त्याच्या मागे अनेक मुली होत्या हे ही प्रेक्षकांना माहित आहे. एवढ्या सगळ्यांमध्ये प्रियाचा नम्बर लागला. त्यांच्या लव्हस्टोरीमध्ये काही महिन्यांच्या तारखांना, आकड्यांना विशेष महत्त्व आहे ते नेमकं काय माहित आहे का?

काय आहे हे तारखांचं प्रकरण?

प्रिया आणि उमेशने 'दोन स्पेशल' या मुलाखतीच्या कार्यक्रमात हा किस्सा शेअर केला होता. त्यांच्या लव्हस्टोरीमध्ये प्रियाने उमेशला प्रपोज केलं होतं. उमेश असं सांगतो, "मी मुळातच खूप वेळ घेऊन निर्णय घेणाऱ्यांपैकी आहे. त्यामुळे आमच्या नात्याच्या बाबतीतसुद्धा मी प्रचंड वेळ घेत होतो. आम्हाला दोघांनाही एकमेकांबद्दल प्रेम वाटत होतं पण तरीही मी काहीसा बॅक फूटवरच होतो. प्रिया सुद्धा नात्याला वेळ देऊ आणि कुठंवर हे टिकतं हे पाहू म्हणून खूप दिवस थांबली होती. मात्र तिने 9 ऑगस्ट या दिवशी न राहवून मला आमच्या नात्याचं पुढे काय होणार असा प्रश्न केलाच. त्यावेळी 9 तारखेला 9 to 9 अशा वेळेत फोनकॉल फुकट असायचे. तेव्हा ही मी तिला थेट हो म्हणलं नाही मला वेळ दे असं सांगितलं आणि तिच्या वाढदिवशी अर्थात 18 सप्टेंबरला मी तिला होकार दिला. त्यामुळे या तारखांचं खूप जास्त महत्त्व आहे."

उमेशने प्रियाला होकार द्यायला 9 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर एवढा काळ घेतला याचा आवर्जून तारखांसहित उल्लेख त्याने मुलाखतीत केला आहे.

प्रिया आणि उमेश लग्नाआधी मुंबईतल्या वेगवेगळ्या जागी फिरायला जायचे. वेळ एकत्र घालवण्यासाठी दोघे बाईकवर ड्राइव्हला जायचे. तेव्हा उमेश प्रियाला गाणं म्हणायचा आग्रह करायचा असं ती या मुलाखतीत सांगते.

प्रिया आणि उमेश यांच्यात वयाचं अंतर आहे पण तरीही ते दोघेही एवढे हँडसम आणि गोड आहेत की त्यांच्या प्रेमापुढे ही गोष्ट नगण्य वाटते. ते कायमच एकत्र असतात. एकमेकांसाठी त्यांचं असलेलं प्रेम त्यांच्या चाहत्यांना विशेष आवडतं.

First published:

Tags: Cute couple, Love story, Marathi entertainment, Priya bapat