मुंबई, 26 नोव्हेंबर : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कायमच चर्चेंच्या केंद्रस्थानी असतो. तो अभिनयाव्यतिरिक्त त्याच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो. लग्नाच्या विषयावरुन तर त्याचं नेहमीच कोणासोबत तरी नाव जोडलं जातं. सध्या त्याचे नाव अभिनेत्री लुलिया वंतूरसोबत जोडले जात आहे. स्वतः सलमान खानने या सर्व गोष्टी कधीच स्वीकारल्या नाहीत आणि लुलिया वंतूरनेही यावर कधी उघडपणे बोललेलं नाही. पण राखी सावंतच्या एका व्हिडीओने सलमान खानचे रहस्य जगासमोर उलगडले आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सलमानच्या रुमर्ड गर्लफ्रेंडच्या चर्चा रंगल्या आहेत. राखी सावंतने सोशल मीडियावर लुलिया वंतूरसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ राखी सावंतच्या वाढदिवसाच्या पार्टीचा आहे. या व्हिडीओमध्ये लुलिया आणि राखी सावंत डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत राखीने म्हटलं, ‘माय स्वीटहर्ट वहिनी’. या व्हिडीओमध्ये राखीने सलमान खानलाही टॅग केलेलं दिसत आहे. यामध्ये दोघीही परदेसिया गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. अशा सार्वजनिक व्यासपीठावर लुलिया वंतूरला वहिनी म्हटल्याने राखी सावंत चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पडत असल्याचं दिसत आहे.
राखीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे तू चांगलीच अडचणींत येऊ शकते, पहिले भावाला तर विचार वहिनी करणार आहे का नाही, तू तर सगळीचे पोल खोलली, सलमान आता बॅचलर नाही’, अशा अनेक कमेंट व्हिडीओवर येताना दिसत आहेत. आता या व्हिडीओवर सलमानची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, सलमान आणि युलियाच्या चर्चां सोशल मीडियावर रंगलेल्या दिसत आहे. सलमान आणि युलियानाच्या रिलेशनशिपच्या चर्चा जरी होत असल्या तरी याविषयी दोघांनीही काही अधिकृतरित्या सांगितलेलं नाहीये. त्यामुळे दोघांची गोष्ट लग्नापर्यंत पोहचणार का?, असा प्रश्न चाहते वारंवार विचारताना दिसतात. यावर मात्र दोघांनीही मौन बाळगलं आहे.