मुंबई 20 सप्टेंबर : राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यनंतर आता इंग्लंडचे ‘प्रिंस ऑफ वेल्स’ चार्ल्स तिसरे किंग बनले आहेत. असे सांगितले जात आहे की, किंग चार्ल्स राजघराण्याच्या बाबतीत काही मोठे बदल करणार आहेत. ज्यानंतर त्याची संपूर्ण जग त्यांचीच चर्चा होऊ लागली. परंतू या सगळ्यात किंग चार्ल्सबद्दल आणखी एक चर्चा केली जात आहे, ज्याचा संबंध थेट भारताशी आहे. नाही, नाही तुम्ही विचार करताय तसं, त्यांच्या किंग बनण्याचा आता सध्या तरी काही संबंध भारताशी नाही, पण आम्ही जे बोलतोय, ते त्यांच्या जुन्या आठवणींबद्दल, हा संबंध फक्त भारताशी नाही तर एका मराठमोठ्या अभिनेत्रीशी आहे. हा किस्सा 1980 चा आहे. जेव्हा किंग चार्स भारतात आले होते. त्यानंतर असं काही घडलं ज्यामुळे भारतीय मीडियाच नाही, तर जगभरातील मीडियाला अगदी सेन्सेशन न्यूज मिळाली. हा ‘kiss चा किस्सा’ आजही सगळ्यांच्या लक्षात आहे आणि प्रिंस चार्ल्सच किंग बनल्यानंतर तर लोकांनी त्याची आवर्जून आठवण देखील काढली. का किस्सा आहे प्रिंस चार्ल्स आणि मराठमोळी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांच्या Kissचा…..
सोर्स : गुगल
खरंतर 1980 मध्ये प्रिंस चार्ल्स यांनी प्रिन्सेस डायनाशी लग्न करण्यापूर्वी भारताला भेट दिली होती. त्यावेळी ते 32 वर्षाचे होते, त्यांच्या भारतात येण्याची बातमी कळताच सर्वत्र त्यांना पाहाण्यासाठी आनंदाचं वातावरण होतं. प्रिस चार्ल्सनी प्रथम मुंबईला येऊन प्रिंस ऑफ वेल्स या म्यूजियमला भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी व्ही शांताराम यांच्या ‘राजकमल’ स्टुडिओला भेट दिली. त्यावेळेला ‘आहिस्त आहिस्ता’ या बॉलिवूड चित्रपटाचे शुटिंग सुरु होते. तेव्हा पद्मिनी कोल्पापुरे आणि कुणाल कपूर त्या चित्रपटात काम करत होते. प्रिंस चार्ल्स येणार हे कळताच व्ही शांताराम यांनी या चित्रपटाची शुटिंग ‘राजकमल’ स्टुडिओमध्ये ठेवली. जेणेकरुन प्रिंस चार्सला बॉलिवूडच्या शुटिंगचं काम पाहाता येईल. प्रिंस चार्स येणार या बातमीनेच स्टुडिओमध्ये उपस्थीत लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर प्रिंस चार्ल्स यांच्यासमोर शुट झाल्यानंतर पद्मिनी कोल्पापुरे आणि सहकलाकार शशिकला यांनी भारतीय परंपरेनुसार त्यांचं औक्षण केलं आणि त्या नंतर घडला तो बहुचर्चित किस्सा
नक्की असं काय घडलं? त्यावेळेला पद्मिनी कोल्हापूरे यांनी औक्षणाचं ताट बाजूला ठेवून प्रिंस चार्ल्स यांच्या गालावर किस केलं. या घटनेनं तिथे उपस्थित लोकांसह प्रिंस चार्ल्स देखील आश्चर्यचकीत झाले. त्यातून सावरत प्रिंस चार्ल्सने स्मित हस्य करत परिस्थीती सांभाळून नेली. परंतू प्रिंस चर्ल्स व्ही शांताराम यांच्याकडे याबद्दल विचारणा करायला विसरले नाहीत, त्यांनी हळूच त्यांच्याकडे पाहून विचारले की “भारतीय चित्रपटांत Kiss ला परवनगी आहे?” या प्रश्नाला शाब्दिक उत्तर न देता व्ही शांताराम यांनी हळूच नकारार्थी मान डोलावली. अर्थात प्रिंस चार्सच्या या प्रश्नाने हे उघड झालं की, त्यांनी भारतीय संस्कृती आणि बॉलिवूडबद्दल माहिती होती. खरंतर त्या काळात बॉलिवूडमध्ये किस करण्यासाठी किंवा इंटिमेट सिनसाठी परवानगी नव्हती. या प्रसंगानंतर जगभरात त्यांच्या या किसचा किस्सा चांगलाच रंगला. ज्यानंतर मराठमोठी अभिनेत्री पद्मिनी केल्हापूरे या जगभर ओळखल्या जाऊ लागल्या. अभिनेत्रीची जेव्हा या घटनेनंतर मुलाखत घेतली गेली, तेव्हा या किसच्या किस्स्याबद्दल सांगतना त्या फारच कॅज्यूअल होत्या, हे त्यांच्या उत्तरावरुन लक्षात येते. त्या म्हणाल्या की, ‘‘ही काही फार मोठी घटना नव्हती (it was not a big deal), मी फक्त त्यांच्या गालावर हलके चुंबन घेतले. पण लोकांनी त्याला फारच उचलून धरलं.’’ अभिनेत्रीने त्यावेळी या घटनेबद्दल काहीही म्हणाल्या तरी, ज्या काळी हे सगळं घडलं तो काळ हे सगळं स्वीकारायला अजिबात तयार नव्हता. ज्यामुळे हा किस्सा आजही लोकांच्या चांगलाच लक्षात आहे.