मुंबई, 9 जुलै : बाॅलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt)सध्या यशाच्या उंच शिखरावर आहे. अगदी कमी वयातच आलियानं आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. फक्त बाॅलिवूड नव्हे तर आता हाॅलिवूडमध्येही आपली छाप पाडायला आलिया सज्ज झाली आहे. आलिया भट्टनं तिच्या पहिल्या वहिल्या हाॅलिवूड चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. आलियानं हॉलिवूड डेब्यू (Alia hollywood debut)चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’चे शूटिंग पूर्ण(alia complete shooting Heart of stone) होताच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. सध्या आलियाच्या (Alia bhatt instagram)या इन्स्टाग्राम पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. आलिया आणि रणबीर कपूरचं (Ranbir kapoor) नुकतंच लग्न झालंय. लग्नानंतर काही महिन्यातच आलियानं प्रेग्नेंट (alia bhatt pregnancy)असल्याची बातमी शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. अशातच आलियानं गरोदरपणातच ‘हार्ट ऑफ स्टोन’चे (Heart of stone movie) शूटिंग पूर्ण केलं आहे. त्यामुळे आलियासाठी हा चित्रपट आणखी खास बनला आहे. शूटिंग संपताच आलियानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. तिनं लिहिलेल्या कॅप्शननं लक्ष वेधलं आहे. हेही वाचा - करण जोहर करतोय आयकॉनिक ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकची तयारी? आपल्या ड्रीम कास्टचा केला खुलासा आलियानं ‘हार्ट ऑफ स्टोन’च्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. तर अभिनेत्री गॅल गॅडोटसोबत काही छायाचित्रे शेअर केली. ‘Heart of stone’ - माझं संपूर्ण हृदय, ‘या अद्भूत अनुभवासाठी सुंदर गॅल गॅडॉट आणि माझे दिग्दर्शक टाॅम हार्पर यांचे आभार. तुम्ही सर्वांनी मला दिलेल्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल मी सदैव ऋणी राहीन. आता फक्त चित्रपट पाहण्याची प्रतीक्षा आहे’, असं आलियानं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आलियानं पोस्टच्या शेवटी खास रणबीरसाठी लिहिलं आहे की, ‘आता मी घरी येत आहे बेबी’. आलियानं रणबीरसाठी लिहिलेल्या या खास मेसेजवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी आलियाचं कौतुक केलं आहे, अशा परिस्थितीतही तिनं शूटिंग पूर्ण केलं. आलियासाठी हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोटनेही एक खास पोस्ट शेअर केली आहे. आलियासोबत फोटो शेअर करत गॅल गॅडोटनं म्हटलं की, ‘‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटाला गुंडाळणाऱ्या या सुंदर मुलीला आलियाला खूप सारं प्रेम. खूप प्रतिभाशाली व्यक्ती आणि खूप छान माणूस’.