जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / करण जोहर करतोय आयकॉनिक 'कुछ कुछ होता है'च्या रिमेकची तयारी? आपल्या ड्रीम कास्टचा केला खुलासा

करण जोहर करतोय आयकॉनिक 'कुछ कुछ होता है'च्या रिमेकची तयारी? आपल्या ड्रीम कास्टचा केला खुलासा

करण जोहर करतोय आयकॉनिक 'कुछ कुछ होता है'च्या रिमेकची तयारी? आपल्या ड्रीम कास्टचा केला खुलासा

बॉलिवूडमध्ये (Bollywood) असे काही आयकॉनिक चित्रपट आहेत जे आजही प्रेक्षकांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है’ (Kuch Kuch Hota Hai) हा होय.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जुलै-   बॉलिवूडमध्ये (Bollywood) असे काही आयकॉनिक चित्रपट आहेत जे आजही प्रेक्षकांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है**’ (Kuch Kuch Hota Hai)** हा होय. या चित्रपटाने आणि त्यातील गाण्यांनी 90 च्या दशकात प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. त्यांनतर आता या चित्रपटाचा रिमेक आगामी काळात बनला तर यामध्ये कोणती स्टारकास्ट पाहायला मिळू शकते. याबाबत आपण जाणून घेणार आहोत. करण जोहर दिग्दर्शित ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट 1998 मध्ये मोठ्या पडद्यावर रिलीज झाला होता. हा चित्रपट तुफान गाजला होता. या चित्रपटामध्ये शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल ही तगडी स्टार कास्ट झळकली होती.या तिघांवर चित्रित करण्यात आलेली गाणी सुपरडुपर हिट ठरली होती. आजही लोक हा चित्रपट आवडीने पाहतात. आणि आजची नवी पिढीसुद्धा ही गाणी तितक्याच मजेने ऐकताना दिसतात. या चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांना पाहायला आवडेल असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. करणची ड्रीमकास्ट- नुकतंच एका मुलाखतीदरम्यान निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला या चित्रपटाच्या रिमेकबाबत विचारणा केली असता, त्याने आपली ड्रीम कास्टचा खुलासा केला आहे. करण जोहरला विचारण्यात आलं होतं, ’ ‘कुछ कुछ होता है’ चा रिमेक बनला, तर त्याची स्टारकास्ट कोणती असेल? टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना करणने सांगितलं या चित्रपटाचा रिमेक बनला तर त्यामध्ये शाहरुख खानच्या भूमिकेत अभिनेता रणवीर सिंह असेल, काजोलच्या जागी आलिया भट्ट असेल आणि राणी मुखर्जीच्या जागी जान्हवी कपूर असेल.

News18

(हे वाचा: लेकीसोबत पोज देताना दिसली प्रियांका चोप्रा; मालतीसोबत घेतेय निसर्गाचा आनंद **)** सध्या करण जोहर ‘कोफी विथ करण’ च्या सातव्या सीजनसह परतला आहे. तरुणाईमध्ये या चॅट शोची प्रचंड उत्सुकता आहे. अवघ्या तीन वर्षानंतर हा शो परत येत आहे. या शोच्या पहिल्या भागात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह हजेरी लावणार आहेत. सोबतच या सीजनमध्ये बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमधील अनेक सुपरस्टार्स हजेरी लावणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात