Home /News /entertainment /

अरररर.. खतरनाक… मनसेच्या दहीहंडीला प्रविण तरडे नाचणार

अरररर.. खतरनाक… मनसेच्या दहीहंडीला प्रविण तरडे नाचणार

मनसेने केली दहीहंडीची घोषणा; प्रविण तरडेने दिला जाहीर पाठिंबा

    मुंबई 22 जुलै: दहीहंडी (Dahi Handi 2021) हा महाराष्ट्रातील सर्वाधिक आवडत्या सणांपैकी एक म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षी कोरोनाचा वाढत्या संक्रमणामुळे या दहीहंडीच्या उत्साहावर पाणी फेरलं होतं. परंतु यावेळी मात्र संपूर्ण महाराष्ट्रात गोविंदा रे गोपाला हा आवाज गरजणार अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) केली आहे. मनसेने विश्वविक्रमी दहीहंडी स्पर्धा (Dahi Handi competition) आयोजित केली आहे. अन् या सोहळ्यात येऊन मी नाचणार अशी घोषणा प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रविण तरडे (Pravin Tarde) याने केली आहे. Video: चंदा करणार पोलिसांची मदत? स्टोरीमधील ट्विस्ट पाहून ‘देवमाणूस’ही घाबरला मनसे नेते अभिजित पानसे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दहीहंडीबाबत ही मोठी घोषणा केली. “विश्वविक्रमी दहीहंडी 31 ऑगस्टला होणार”, असं म्हटलं आहे. यावर आता प्रविण तरडेने “100 टक्के नाचायला येणार” अशी कमेंट केली आहे. ही कमेंट पाहताच त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. प्रविण तरडेने मनसेच्या दहीहंडिला पाठिंबा दिल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. ‘पती करतो porn आणि पत्नी yoga’; Hungama 2 मधील गाण्यामुळे Shilpa Shetty troll कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे प्रशासन वारंवार सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व निर्बंधांचं पालन करण्यास सांगत आहे. या पार्श्वभूमीवर दहीहंडी कशी साजरी केली जाणार याबाबत सर्वांच्याच मनात शंका आहे. सरकारने याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: MNS, Raj thackarey, Sangharsh dahi handi

    पुढील बातम्या