Home /News /entertainment /

राजा हिंदुस्तानी फेम प्रतिभानं का सोडलं बॉलिवूड? 23 वर्ष जगतेय निनावी आयुष्य

राजा हिंदुस्तानी फेम प्रतिभानं का सोडलं बॉलिवूड? 23 वर्ष जगतेय निनावी आयुष्य

परदेसी परदेसी या गाण्यामुळे लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री का होती नैराश्येत?

    मुंबई 4 जुलै: राजा हिंदुस्तानी (Raja Hindustani) हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटामुळंच आमिर खान (Aamir Khan) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) सुपरस्टार झाले असं म्हणतात. परंतु या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होतं. ही अभिनेत्री होती प्रतिभा सिन्हा. (Pratibha Sinha) परदेसी परदेसी या गाण्यामध्ये तिनं केलेलं नृत्य पाहून प्रेक्षकांनी तिचं प्रचंड कौतुक केलं होतं. शिवाय दिसायला देखील ती फारच सुंदर होती त्यामुळं येत्या काळात ती बिग बजेट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणार अशी भविष्यवाणी अनेक नामांकित समिक्षक करत होते. परंतु या भविष्यवाणी खोट्या ठरल्या कारण एका गाण्यातून रातोरात प्रसिद्धी मिळवणारी प्रतिभा एकाएकी बॉलिवूडमधून गायब झाली. अन् गेली 23 वर्ष ती निनावी आयुष्य जगत आहे. केतकी दवे यांनी का सोडली ‘क्योकी सास भी कभी बहु थी’? 21 वर्षानंतर सांगितलं कारण प्रतिभा सिन्हा यांचा जन्म 1969 कोलकातामध्ये झाला होता. त्यांच्या आई माला सिन्हा या बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री होत्या. त्यामुळे अभिनयाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. 1992 साली मेहबूब मेरे मेहबूब या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या करिअरमध्ये एकूण 13 चित्रपटांमध्ये काम केलं. राहुल गांधींमुळे बिग बी आणि सोनिया गांधींची मैत्री तुटली; पुस्तकाद्वारे केला मोठा दावा प्रतिभा सिन्हा संगीत दिग्दर्शक नदीम सैफसोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळे त्यावेळी प्रचंड चर्चेत आल्या होत्या. प्रतिभा नदीमच्या प्रेमात इतक्या वेड्या झाल्या होत्या की त्यामुळे त्यांचं करिअर देखील संपलं. दोघं लग्न देखील करणार होते. परंतु नदीम विवाहित असल्यामुळे प्रतिभाच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यानंतर नदीमचं नाव गुलशन कुमार हत्या प्रकरणात समोर आलं होतं. या प्रकरणामुळे दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर प्रतिभा काही काळ नैराश्येत देखील होत्या. 'मिलिट्री राज' या चित्रपटात त्यांनी शेवटचं काम केलं होतं. तेव्हापासून जवळपास दोन दशकं त्या अज्ञातवासात राहात आहेत.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Aamir khan, Bollywood actress, Entertainment

    पुढील बातम्या