मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /आता आपल्या पंजाबी स्टारने रिलीज केलं रिहानासाठी गाणं, RiRi Song व्हायरल

आता आपल्या पंजाबी स्टारने रिलीज केलं रिहानासाठी गाणं, RiRi Song व्हायरल

दिलजीत दोसांज (diljit dosanjh) हा गायक शेतकरी आंदोलनानंतर खूपच चर्चेत आला. आता त्यानं रिहानाला (Rihanna) समर्पित केलेला म्युझिक व्हिडिओ लॉन्च केला.

दिलजीत दोसांज (diljit dosanjh) हा गायक शेतकरी आंदोलनानंतर खूपच चर्चेत आला. आता त्यानं रिहानाला (Rihanna) समर्पित केलेला म्युझिक व्हिडिओ लॉन्च केला.

दिलजीत दोसांज (diljit dosanjh) हा गायक शेतकरी आंदोलनानंतर खूपच चर्चेत आला. आता त्यानं रिहानाला (Rihanna) समर्पित केलेला म्युझिक व्हिडिओ लॉन्च केला.

मुंबई, 11 फेब्रुवारी : शेतकरी आंदोलनाबाबत (farmer protest) पॉप स्टार रिहानानं (pop star Rihanna) ट्विट (tweet) केल्यानंतर भारतात तिच्याविषयी प्रचंड गुगल केलं जाऊ लागलं. याच कुतूहलाला उचलत लोकप्रिय अभिनेता आणि पंजाबी गायक दिलजीत दोसांज (Punjabi singer Diljit Dosanjh)  यानंही आता रिहानाला समर्पित करून एक गाणं गायलं आहे.

रीरी साँग (RiRi song) असं नाव असलेलं हे गाणं राज राजोन्ध यानं लिहिलं आहे. याला संगीत दिलं आहे इंटेन्स यानं. बुधवारी दिलजीत दोसांज यानं या गाण्याचा व्हिडिओ रिलीज केला. दिलजीतनं हे गाणं रिहानाला समर्पित केलं आहे. रिहाननं ट्विट केल्यावर काही तासातच या गाण्याचा ऑडिओ दिलजीतनं रिलीज केला होता.

या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये त्यानं रिहानाच्या म्युझिक क्लिप्स वापरल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिलजीतनं लिहिलं आहे, 'तेरे कॉन्सर्टमें आऊंगा कुर्ता पायजामा पहनकर.' दिलजीतनं रिहानाच्या ट्विटलाही लाईक केलं होतं.

या गाण्यात दिलजीतनं रिहानाबाबत आदर व्यक्त केला आहे. एकदम दिलजीतच्या लोकप्रिय शैलीतलं हे गाणं आहे. याआधीही दिलजीतनं कायली जॅनर आणि करीना कपूर (Kareena kapoor) या दोघींना डेडिकेट केलेली गाणी बनवली आहेत. दिलजीतनं गायलेलं हे गाणं आणि त्याचा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. या म्युझिक व्हिडिओला (Music Video) एक कोटीहून जास्त लाईक्स मिळाले आहेत.

हेही वाचा - टोनी कक्करच्या 'Booty Shake' या नव्या गाण्यावर हंसिका मोटवानीचा जबरदस्त डान्स

गाण्यावर कमेंट्स करतानाही चाहत्यांनी दिलजीतचं भरभरून कौतुक केलं आहे. मात्र काही लोकांनी त्याला विरोधही केला आहे. एका युजरनं लिहिलं आहे, की 'जे काही चांगलं किंवा वाईट असेल त्याबाबत आवाज उंचावणं वाईट नाही. मात्र आपल्या देशातल्या प्रश्नांच्या सोडवणुकीत विदेशी लोकांना सहभागी करून घेणं योग्य नाही. तुम्ही चांगले गायक आहात. पण हे मात्र आवडलं नाही.'

First published:

Tags: Farmers protest, Instagram, Pop star