जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Prasad Oak: चंद्रमुखीआधी प्रसाद ओकनं दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट पाहिलाय का? मिळालाय राष्ट्रीय पुरस्कार

Prasad Oak: चंद्रमुखीआधी प्रसाद ओकनं दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट पाहिलाय का? मिळालाय राष्ट्रीय पुरस्कार

Prasad Oak: चंद्रमुखीआधी प्रसाद ओकनं दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट पाहिलाय का? मिळालाय राष्ट्रीय पुरस्कार

प्रसाद ओकनं दिग्दर्शित केलेला चंद्रमुखी हा पहिला सिनेमा नव्हता. याआधीही प्रसाद काही सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. कोणता आहे तो सिनेमा जाणून घ्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 ऑगस्ट: मराठी सिनेसृष्टीला लाभलेल्या काही हुशार अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे सर्वांचा लाडका प्रसाद ओक. प्रसाद उत्तम अभिनेता आहे हे त्यानं आजवर दाखवून दिलं आहे. नुकत्याच आलेल्या धर्मवीर सिनेमात प्रसाद मुख्य अभिनेता म्हणूनही किती तगडा आहे हेही त्यानं दाखवून दिलं. प्रसाद अभिनय करतोच आणि त्याचप्रमाणे त्यानं आता दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. सिनेमासाठी प्रसादचं सर्वत्र कौतुकही झालं. परंतू तुम्हाला माहिती आहे का प्रसाद ओकनं दिग्दर्शित केलेला चंद्रमुखी हा पहिला सिनेमा नव्हता. याआधीही प्रसाद काही सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. ज्याची नोंद थेट सरकार दरबारी घेऊन सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.  तो सिनेमा म्हणजे प्रसाद ओक दिग्दर्शित सोनाली कुलकर्णी, रवी जाधव अभिनीत ‘कच्चा लिंबू’. सिनेमाला आज पाच वर्ष पूर्ण झाली असून सिनेमाचं पोस्टर शेअर करत प्रसादनं खास पोस्ट शेअर केली आहे. कच्चा लिंबू हा सिनेमा स्पेशल चाइल्ड आणि त्यांच्या घरातील पालकांच्या परिस्थिती यावर आधारित होता. सिनेमात अभिनेता मनमीत पेमनं स्पेशल चाइल्डची भूमिका केली होती. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि रवी जाधवनं त्या स्पेशल मुलाच्या आई वडिलांची भूमिका केली होती. फार महत्त्वाच्या विषयावर हात घालणारा हा सिनेमा प्रेक्षकांनाही आवडला आणि सिनेमालाराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. हेही वाचा - Balumamachya Navan Chang Bhala : बाळूमामांचे बोल खरे ठरणार; दैवी सामर्थ्याने पाटलाचा अहंकार नष्ट होणार

जाहिरात

कच्चा लिंबू सिनेमातून अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शक प्रसाद ओकच्या भूमिकेत आला. प्रसादनं सिनेमा उत्तमरित्या दिग्दर्शित केला. त्याच्यासाठी हा सिनेमा खास ठरला कारण दिग्दर्शनाच्या पहिल्याच सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. सिनेमाला पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रसादनं खास पोस्ट शेअर करत सगळ्यांचे आभार मानलेत. त्यानं म्हटलंय, ‘कच्चा लिंबू.  दिग्दर्शक म्हणून माझा पहिला चित्रपट. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट. आज कच्चालिंबूला 5 वर्ष पूर्ण झाली. पुन्हा एकदा संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार’. कच्चा लिंबू सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर प्रसाद ओकनं हिरकणी आणि चंद्रमुखी सिनेमाचं दिग्दर्शन केलं. त्याचप्रमाणे 2009मध्ये त्यानं अभिनेता पुष्कर श्रोत्रीसह हाय काय नाय काय सिनेमाचंही दिग्दर्शन केलं आहे. तर प्रसाद ओक दिग्दर्शित भद्रकाली हा नवा सिनेमा 2023मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात