मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Prasad Oak : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रसादच्या पुस्तकाचं जोरदार प्रकाशन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Prasad Oak : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रसादच्या पुस्तकाचं जोरदार प्रकाशन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

प्रसाद ओक

प्रसाद ओक

प्रसाद ओकने आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित "माझा आनंद" हे पुस्तक लिहिलं आहे. अखेर त्याच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 30 सप्टेंबर : मराठी चित्रपटसृष्टीतीळ 2022 हे वर्ष प्रसाद ओकने गाजवलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. या वर्षात तो दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून यशस्वी झाला. या दोन क्षेत्रात कौशल्य गाजवल्यानंतर आता प्रसाद ओक नवीन क्षेत्रात पाउल टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. तो आता लेखक या रूपाने आपल्या भेटीस आला आहे. प्रसाद ओकने  आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित "माझा आनंद" हे पुस्तक लिहिलं आहे. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी प्रसादने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. अखेर त्याच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला आहे.

प्रसाद ओकचा एक अभिनेता म्हणून धर्मवीर आनंद दिघे या भूमिकेपर्यंत पोहोचवण्याचा प्रवास या पुस्तकातून सर्वांना जाणून घेता येणार आहे. त्याने या भूमिकेसाठी कशी तयारी केली, त्याची मेहनत, त्याला आलेले अनुभव या त्याच्या प्रवासावर त्याने हे पुस्तक लिहिले आहे. ‘माझा आनंद’ या पुस्तकाचं नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आलं. प्रसाद ओकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी विविध फोटोही पोस्ट केले आहेत.

हेही वाचा - Adipurush First Look: बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष'चा फर्स्ट लुक रिलीज; श्रीरामांच्या योद्धा अवतारात दिसला प्रभास

प्रसाद ओकने सोशल मीडियावर पुस्तक प्रकाशनाचे फोटो शेअर करत लिहिलंय कि,  “श्री सिद्धिविनायक आणि मा. गुरुवर्य दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब, आणि मा. उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब, यांच्या हस्ते “माझा आनंद” या माझ्या पुस्तकाचं आज अनावरण झालं मा. दादा भुसे जी, आमचे निर्माते मित्र मंगेश देसाई, आमचे मित्र श्री सचिन जी जोशी, आणि माझी पत्नी मंजिरी ओक हे सर्व माझ्या सोबत या आनंदाच्या क्षणी उपस्थित होते. मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो”, अशा शब्दात प्रसादने भावना व्यक्त केल्या आहेत.

धर्मवीर आणि चंद्रमुखी हे चित्रपट प्रदर्शित होण्यात फक्त १५ दिवसांचं अंतर होतं. दोन्ही चित्रपटातील विविध भूमिका साकारणं प्रसादासाठी खूप आव्हानात्मक होतं. या प्रवासाबद्दलच 'माझा आनंद' हे पुस्तक असणार आहे असं प्रसादने न्यूज १८ लोकमतशी  बोलताना सांगितलं होतं. तो म्हणाला होता कि, 'हे दोन्ही चित्रपट साकारताना प्रचंड तारांबळ झाली. या सगळ्या तारंबळीचा प्रवास मी माझ्या आगामी पुस्तकात  'माझा आनंद' मध्ये मांडला आहे.'

या पुस्तकाला राजकारणाशी जोडले जात असताना त्याने सांगितले होते  कि, 'हे पुस्तक राजकीय नाही. या पुस्तकाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. हे पुस्तक पूर्णपणे कलाक्षेत्राशी निगडित आहे. चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येकाला 'धर्मवीर' सारखा चित्रपट निर्माण करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे दाखवणारी आणि आमचा प्रवास सांगणारी कहाणी 'माझा आनंद' या पुस्तकात आहे.'

First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment