जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Adipurush First Look: बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष'चा फर्स्ट लुक रिलीज; श्रीरामांच्या योद्धा अवतारात दिसला प्रभास

Adipurush First Look: बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष'चा फर्स्ट लुक रिलीज; श्रीरामांच्या योद्धा अवतारात दिसला प्रभास

प्रभास

प्रभास

साऊथ सुपरस्टार प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ओम राऊत दिग्दर्शित या बहुचर्चित चित्रपटाचा फर्स्ट लुक आता समोर आला आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 सप्टेंबर-   साऊथ सुपरस्टार प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ओम राऊत दिग्दर्शित या बहुचर्चित चित्रपटाचा फर्स्ट लुक आता समोर आला आहे. नुकतंच चित्रपटाच्या कलाकारांनी आपल्या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टरमध्ये ‘बाहुबली’ स्टार प्रभास  श्रीरामाच्या योद्धा अवतारात दिसून येत आहे. हा पोस्टर समोर येताच प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. अभिनेता प्रभासने नुकतंच आपल्या इस्टाग्राम अकाउंटवर आपल्या चित्रपटाचा फर्स्ट पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये प्रभास हातात धनुष्य बाण घेऊन गुडघ्यावर बसला आहे. त्याने आकाशाकडे बघत आपला धनुष्यबाण ताणून धरला आहे. अभिनेत्याचा हा फर्स्ट लुक प्रभू श्री रामाच्या योद्धा अवतारातील आहे. हा पोस्टर समोर येताच प्रभासचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. पोस्टर शेअर करत प्रभासने आपल्या चित्रपटाच्या टीजर रिलीजच्या तारखेचीही घोषणा केली आहे. 2 ऑक्टोबरला ‘आदिपुरुष’ चा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाहिरात

अभिनेता प्रभाससोबतचं अभिनेत्री क्रिती सेनननेही ही पोस्ट शेअर केली आहे. हा पोस्टर रिलीज करत दोघांनी कॅप्शनमध्ये लिहलंय, ‘आरंभ, अयोध्या, यूपी येथे सरयू नदीच्या काठावर जादुई प्रवास सुरु करण्यासाठी आमच्यासोबत सहभागी व्हा. आमच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर आणि टीजर आमच्यासोबत अयोध्येत 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.11 वाजता अनावरण करायला तयार राहा. बहुचर्चित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये प्रभू रामाच्या भूमिकेत अभिनेता प्रभास दिसणार आहे. तर क्रिती सेनने सीतेची भूमिका साकारली आहे. या दोघां व्यतिरिक्त चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसुद्धा आहे. सैफ अली खान या चित्रपटात लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात