मुंबई, 6 सप्टेंबर : मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हीची लोकप्रियता प्रचंड आहे. प्रार्थना ही एक उत्तम अभिनेत्री आहे, तिचे लाखो चाहते आहेत. प्रार्थनाने ‘पवित्र रिशता’ या प्रसिद्ध मालिकेद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला पहिल्याच मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक हिट सिनेमे दिले. तिचे ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ हे सिनेमे बरेच गाजले. त्यानंतर ती पुन्हा टेलिव्हिजन विश्वात परतली. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील तिची नेहा कामत ही भूमिका प्रचंड गाजली. या मालिकेतून प्रार्थना घराघरात पोहचली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग झाले. आता नेहा कामत या व्यक्तिरेखेचा निरोप घेताना प्रार्थना भावुक झाली आहे. तिने नेहाला एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. प्रार्थना बेहरे सोशल मीडियावरही प्रार्थना प्रचंड अॅक्टिव्ह आहे. आता तिने नेहा कामत या व्यक्तिरेखेला निरोप देताना खास पोस्ट शेअर केली आहे. तिने नेहा कामतच्या रूपातील एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती नेहाला, ‘अभि ना जाओ छोडकर, के दिल अभि भरा नहीं’ असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच नेहा कामत म्हणून हे शेवटचं रील असेल असं देखील तिने म्हटलं आहे.त्यासोबतच तिने नेहावर भरभरून प्रेम करण्यासाठी प्रेक्षकांचे देखील आभार मानले आहेत.
तिची ही पोस्ट पाहून चाहते देखील भावुक झाले आहेत. या पोस्टवर त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर ‘आम्ही नेहाला खूप मिस करू’, ‘तुझी आणि परिची खूप आठवण येईल’, ‘तू कायम आमच्या आठवणीत राहशील’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत. हेही वाचा - Shehnaaz Gill : लालबागच्या दरबारात शहनाज गिल सोबत अनोख्या रुपात दिसला सिद्धार्थ शुक्ला; पाहून तुम्हीही व्हाल EMOTIONAL झी मराठीच्या एका नव्या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मालिकेचं नाव ‘दार उघड बये’ असं आहे. माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या जागेवर ‘दार उघड बये’ ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये अभिनेते शरद पोंक्षे दिसत आहेत. तसेच या मालिकेचे कथानकही हटके असणार आहे, असा अंदाज प्रोमो पाहून लावला जाऊ शकतो.