Home /News /entertainment /

Kushal Badrike: बापरे! कुशल बद्रिकेने dummy न वापरता केले खतरनाक स्टंट, पाहा video

Kushal Badrike: बापरे! कुशल बद्रिकेने dummy न वापरता केले खतरनाक स्टंट, पाहा video

चला हवा येऊ द्या मधून प्रचंड लोकप्रिय होत असणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) आज विनोद सोडून चक्क स्टंटबाजी करताना दिसत आहे. काय आहे हा प्रकार?

  मुंबई 26 जून: चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमाचं वेड संपूर्ण महाराष्ट्राला आहे. हवा येऊ द्या गॅंगमध्ये भरलेले अवली कलाकार हेच या कार्यक्रमाच्या यशाचं गमक आहे यावर दुमत नाही. या टीममध्ये अनेक अतरंगी कलाकार आहेत त्यातलंच एक खतरनाक नाव म्हणजे (Kushal Badrike) कुशल बद्रिके. कुशल सोशल मीडियावर (Kushal Badrike Instagram) प्रचंड प्रमाणात ऍक्टिव्ह असतो. कधी ऑफ स्क्रीन चालणारी धमाल तो शेअर करत असतो तर कधी घराच्या काही candid moments शेअर करताना दिसतो. कुशलची नवी पोस्ट सध्या बरीच गाजताना दिसत आहे. यात हवा येऊ द्या च्या स्किटमध्ये कुशल खतरनाक स्टंटबाजी करताना दिसत आहे. कुशल असे काही खतरनाक आणि अव्व्ल दर्जाचे एक्सप्रेशन देतो की समोरच्याच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहत नाही. असंच काहीसं तो नव्या विडिओमध्ये करताना दिसत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत तो लिहितो, “एकदाका आम्ही ठरवलं की ही फिल्म “actionfilm “ की विषय संपला . बजेट वगैरे मॅटरच करत नाय आपल्याकडे . आता Stunts बघाच फक्त .आणी एक “आपले Stunts आपण स्वताः करतो”. No Dummy. कुशलची खासियत म्हणजे त्याने ठरवलं तर तो कशातूनही विनोद निर्माण करू शकतो. या व्हिडिओमध्ये कुशल भन्नाट fight scene करताना दिसत आहे. अगदी अंगावर fighter plane येण्यापासून मशीन गण चालवेपर्यंत सगळं एकट्याने यामध्ये करताना दिसतो आहे. आणि हा जगावेगळा फाईट सिक्वेन्स पाहून तुमच्या डोळ्यात हसून हसून पाणी येईल याची खात्री आहे.
  चला हवा येऊ द्या च्या मंचावर हे सगळेच कलाकार अगदी कुटुंबासारखे राहतात. अगदी चालू स्किटमध्ये एकमेकांची मजा करण्यापासून ऑफ स्क्रीन एकमेकांना फजिती करून तोंडावर पाडायला ही टीम कमी करत नाही. एकमेकांची टिंगल, मस्करी करण्यात तर सगळेच पटाईत आहेत. असे अनेक किस्से कुशल कायम आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. त्याचा कामातला प्रामाणिकपणा आणि निखळ विनोद याने तो कायमच प्रेक्षकांच्या आवडीचा राहिला आहे. हे ही वाचा- Sai Tamhankar: सईचा बर्थडे यावर्षी एकदम दणक्यात; एकीकडे आयफा तर दुसरीकडे दिलं स्वतःला मोठं गिफ्ट!
   चला हवा येऊ द्या या शोची क्रेझ एवढी जास्त आहे की बॉलिवूड कलाकारांना सुद्धा त्याची भुरळ पडली आहे. कुशलच्या व्हिडिओमध्ये आदित्य रॉय कपूर दिसत आहे त्यामुळे ‘ओम-द बॅटल विदिन’ या चित्रपटाची टीम नुकतीच कार्यक्रमात येऊन गेल्याचा अंदाज बांधला जात आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Chala hawa yeu dya, Zee Marathi

  पुढील बातम्या