मुंबई 24 जून: मराठीतील एक जाणकार अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नावारूपास येताना दिसत आहे. प्राजक्ताचं नाव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. रानबाजार (RaanBaazaar webseries) या वेबसिरीजमुळे प्राजक्ता चांगलीच चर्चेत आली होती. सध्या तिचा एक इंटरव्यू सुद्धा खूप गाजताना दिसत आहे. प्राजक्ता Y या थरारपटाच्या (Y Marathi Movie) माध्यमातून आपल्या भेटीला येत आहे. हा चित्रपट आजच प्रदर्शित झाला असून त्याच्या अनोख्या टिझर आणि ट्रेलरमुळे या चित्रपटाबद्दल वेगळीच उत्सुकता चाहत्यांच्या मनात होती. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेली एक मुलाखत सध्या गाजताना दिसत आहे. या मुलाखतीत तिने केलेलं एक वक्तव्य सगळीकडेच गाजताना दिसत आहे. तिला असं विचारलं होतं की प्राजक्ता ज्या ज्या कलाकृतीत असते ती कलाकृती हिट होते. त्यावर तिने असं स्पष्टीकरण दिलं की, “नाही मला आधीच माहित असतं की ही कलाकृती हिट होणारे म्हणूनच मी त्या प्रोजेक्ट्सना होकार देते. चंद्रमुखीची संहिता ऐकवल्यावरच मला कळलं होतं की हा एक यशस्वी व्यावसायिक चित्रपट आहे. तसंच पावनखिंडीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची यशोगाथा पोहचणार म्हणजे तो सुद्धा नक्कीच यशस्वी होईल, तसंच पांडू चित्रपटाबद्दल सुद्धा मला खात्री होती की हा सिनेमा कमर्शियल पातळीवर यशस्वी होईल म्हणून मी त्या चित्रपटांचा भाग झाले.” प्राजक्ताने हसतहसत आपलं हे स्पष्टीकरण प्रसारमाध्यमांना दिल्याचं समोर येत आहे.
प्राजक्ताला (Prajakta Mali bold character) मागच्या काळात अनेकांनी तिच्या बोल्ड अंदाजावरून भयानक ट्रोल केलं होतं. तिच्या भूमिकेचा गाभा समजून न घेता तिच्याबद्दल अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केलं होतं. मात्र या काळात अनेकांनी तिची बाजू घेत एक अभिनेत्री म्हणून तिने उचललेल्या या धाडसी पावलाचं कौतुक केलं. आणि अर्थात वेबसिरीज सिलीज झाल्यावर अनेकांना तिची ही रत्ना नावाची भूमिका जाम आवडली. हे ही वाचा- Manasi Naik: रिक्षावाला फेम मानसी नाईक रमली विठुरायाच्या भक्तीत, पाहा हा सुंदर video
प्राजक्ता गेल्या अनेक दिवसात वेगवेगळ्या अंदाजाच्या आणि अनेक वेगवेगळ्या शेड असणाऱ्या भूमिकांमधून समोर आली होती. आता तिच्या नव्या प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना बरीच उत्सुकता आहे. प्राजक्ता एक यशस्वी अभिनेत्री तर आहेच शिवाय ती काव्यलेखन सुद्धा करते आणि आता ती निर्मिती क्षेत्रात सुद्धा उतरली आहे.