मुंबई 24 जून: सध्या सगळीकडेच आषाढी वारीचं वातावरण आहे. अखेर दोन वर्षांच्या महमरीच्या संकटांनंतर वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला जायची संधी यावर्षी मिळणार आहे. अनेक कलाकारांनी या संधीचा लाभ घेत वारीत वेगवेगळ्या प्रकारे सहभाग घ्यायचा प्रयत्न केल्याचं सुद्धा दिसून येत आहे. अशातच मानसी नाईक (Manasi Naik) या अभिनेत्रींच्या एका व्हिडिओची चर्चा होताना दिसत आहे. मानसीने खास आषाढी वारीच्या वातावरणाला साजेसा एक विडिओ शेअर केला आहे. मानसी सोशल मीडियावर (Mansi Naik Instagram) प्रचंड ऍक्टिव्ह असते. वेगवेगळ्या व्हिडिओच्या स्वरूपात, रील्सच्या माध्यमातून ती चाहत्यांना खुश करत असते. मात्र तिच्या या नव्या व्हिडिओची प्रशंसा होताना दिसत आहे. मानसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती विठ्ठलाची स्तुती करताना दिसत आहे. ‘मायबाप विठ्ठला’ असं म्हणत तिने विठुरायाच्या मूर्तीचं दर्शन तर घेतलंच सोबतच आपल्या भक्तीचं प्रदर्शन सुद्धा केलं. ‘विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची 🙏🏻🌸’ अशी खास कॅप्शन देत तिने एक खास विडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मानसीने यात पिवळ्या रंगाची साडी, कंठहार, चंद्रकोर, नथ असा एकदम सुंदर पोशाख केला आहे. या व्हिडिओमध्ये विठ्ठल रखुमाईच्या गोजरीवाण्या मूर्तीचं दर्शन सुद्धा घडत. मराठी संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा पोशाख आणि त्याला साजेशी भक्ती तिने प्रकट केली आहे. आषाढी वारीचं मराठी संस्कृतीत खूप मोलाचं महत्त्व आहे ते सगळ्यांनाच या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.
एक अजून खास गोष्ट म्हणजे मानसीच्या (Manasi Naik Husband) नवऱ्याने या व्हिडिओवर चक्क मराठीत कमेंट केली आहे. ‘आज माझी बायको खूप सुंदर दिसत आहे,’ अशी कमेंट त्याने केली आहे. मानसीचा लग्न प्रदीप खरेरा या इंटरन्शनल बॉक्सरशी झालं आहे. हे ही वाचा- मराठीतील क्युट कपलचं नवं फोटोशूट; रोमँटिक मूडमध्ये दिसले शिवानी-विराजस प्रदीप हा हरियाणाचा असल्याने त्याला मराठी नीटस येत नाही. पण मानसी आयुष्यात आल्यापासून त्याला थोडथोडकं नव्हे तर चक्क सुंदर मराठी बोलता येत आहे हे समोर येत आहे. मानसीच्या या व्हिडिओचं प्रचंड कौतुक केलं जात आहे. रिक्षावाला फेम मानसी आता कोणत्या नव्या प्रोजेक्टचा भाग असणार यासाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

)







