मुंबई 11 जून: अभिनेत्री (Prajakta Mali) प्राजक्ता माळी ‘रानबाजार’ या वेबसीरिजच्या माध्यमातून एका बोल्ड आणि सुंदर भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली. प्राजक्ताच्या आधीच्या कोणत्याच भूमिका या भूमिकेशी साधर्म्य नसल्याने तिच्या या वेबसीरिजमधील भूमिकेचं प्रचंड कौतुक होत आहे. कलाकारांना बरेचदा भूमिका आत्मसात करण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. या भूमिकेसाठी तिने नक्की काय कष्ट घेतले माहित आहे का? प्राजक्ताने ‘रानबाजार’ वेबसीरिजसाठी अगदी शरीरापासून अभिनयापर्यंत अनेक गोष्टींवर काम केलं आहे. रत्ना या भूमिकेसाठी प्राजक्ताने तब्ब्ल सात-आठ किलो वजन वाढवलं होतं आणि साथ किलोपर्यंत वजन असलेली स्त्री तिने साकारली होती. या मालिकेत वेश्यांच्या भूमिकेत शिरणं आवश्यक असल्याने त्यासारखी चाल, बोलणं यावर सुद्धा तिने बरच काम केलं. या वेबसिरीजमध्ये रत्ना या भूमिकेला व्यसन सुद्धा सल्याने गुटखा, पण मसाला खायची तालीम सुद्धा तिने केली. आता गुटखा आणि पण मसाला तिने खरच खाल्ला का असा प्रश्न पडू शकतो पण तसं काही नाहीये. प्राजक्ताने यासंबंधी (Prajakta Mali Instagram) एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. रत्नाच्या मेकअपपासून ते अगदी व्यसनी दिसावी यासाठी तिने काय कष्ट घेतले यावर ती गेले अनेकदिवस अपडेट शेअर करत आहे त्यातल्याच एका रिसेन्ट पोस्टमध्ये ती म्हणते, “Vanity मध्ये बसून बडीशेप खात मसाला गुटखा वगैरे खातेय असं भासवण्याची practice… .(ह्या दिवशी पहिल्यांदा make up केला होता… सुंदर दिसण्यासाठी नाहीत अर्थात..)" प्राजक्ता आणि तेजस्विनी या दोघींची ‘रानबाजार’ सिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या बोल्ड आणि अत्यंत वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी त्यांना भयानक ट्रोल केलं गेलं. त्यांच्या कामापासून ते अगदी अनेक बाबींपर्यंत त्यांना टीका सहन करावी लागली. रानबाजार ही एक महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य करणारी सिरीज आहे. प्राजक्ताने याआधी अशी भूमिका साकारली नसल्याने तिला नुसत्या ट्रेलर आणि टीजरमधील काही दृश्यांमुळे खूप ट्रोल केलं गेलं.
मात्र वेबसिरीज प्रदर्शित झाल्यावर अनेकांनी समोर येऊन तिला ट्रोल केल्याबद्दल माफी मागितली आणि जाहीरपणे बाउल केलं की या वेब्सिरिज्मध्ये आक्षेपार्ह काही नाही. प्राजक्ताने साकारलेल्या अनेक भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी तिला आनंदाने स्वीकारलं आहे. प्राजक्ताने या सिरीजमधून तिची आतापर्यंत असलेली प्रतिमा पुसून टाकत ती सुद्धा अशा धाडसी भूमिका करू शकते असा विश्वास दाखवून दिला आहे. या अफलातून वेब्सिरिज्मध्ये तिने अनेक सुंदर सीन्स दिले आहेत. काही सीन्स तर तिने वन शॉट दिले ज्याचं प्रचंड कौतुक सुद्धा केलं जात आहे. हे ही वाचा- अंकिता लोखंडे-विकी जैनने दिली Good News; लव्हबर्ड्सच्या आयुष्यात नवा आनंद रानबाजार सिरीज ही वेश्या व्यवसाय आणि एक राजकीय झालर असलेली थरार सस्पेन्स कथा आहे. या वेब्सिरीजचे सगळे एपिसोड आता समोर आले असून या वेबसिरीज मांडणीबद्दल खूप चांगलं मत ऐकायला मिळत आहे.