अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक चांगल्या गोष्टी घडत आहेत.
नुकतंच अभिनेत्रीने टीव्ही रिऍलिटी शो 'स्मार्ट जोडी' मध्ये आपल्या पतीसोबत भाग घेतला होता. विशेष म्हणजे त्यांनी हा शो जिंकलासुद्धा.
त्यांनतर आता पुन्हा एकदा या जोडप्याच्या आयुष्यात गुड न्यूज आहे. परंतु ही गुड न्यूज तुम्हाला वाटत आहे ती नाही.
या दोघांनी नुकतंच या नव्या घरात गृहप्रवेश केला. आणि आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'नव्या सुरुवातीसाठी चिअर्स बेबी' असं कॅप्शन दिलं आहे.
यावेळी दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. सध्या या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.