मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने पाळली घराण्याची परंपरा; चाहत्यांकडून होतंय कौतुक

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने पाळली घराण्याची परंपरा; चाहत्यांकडून होतंय कौतुक

Prajakta Mali

Prajakta Mali

प्राजक्ता माळी एक गुणी अभिनेत्री आहे. ती नेहमी तिच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवताना दिसते. आता तिने घराण्याची ही परंपरा पाळली आहे.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 16 ऑगस्ट : अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम चर्चेत असते. ती सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोबतच तिचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते. प्राजक्ता तिच्या कुटुंबाशी कायम जोडलेली दिसते. ती बऱ्याचदा कुटुंबसोबत वेळ घालवताना दिसते. तिच्या भाच्यांचे फोटो ती शेअर करत असते. तिच्या या गोष्टीमुळे चाहते तिचं नेहमी कौतुक करतात. या गोष्टींमुळेच प्राजक्ता चाहत्यांची लाडकी आहे. आता तिने अजून एक कृती करत चाहत्यांचं मन जिंकलं आहे. प्राजक्ताने तिच्या घराण्याची जुनी परंपरा पाळली आहे. त्याची माहिती तिने सोशल मीडियावरून प्रेक्षकांना दिली आहे. श्रावण महिन्यात शिखर शिंगणापूरला जाऊन महादेवाचं दर्शन घेण्याची तिच्या घराची जुनी परंपरा आहे. हीच परंपरा पाळण्यासाठी काल श्रावणी सोमवारचा मुहूर्त साधत प्राजक्ताने कुटुंबासहित शिखर शिंगणापूरच्या महादेवाचं दर्शन घेतलं. तिने सोशल मीडियावर महादेवाचा अभिषेक करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
त्यासोबतच कॅप्शन लिहिलं आहे कि, 'योगी- महादेव…श्रावण महिन्यात शिखर शिंगणापूर - महादेवाचं दर्शन ; ही घराची परंपरा. काल सोमवारचा मुहूर्त गाठून साळकाय -म्हाळकाय (आई- मावशी किंवा याज्ञा- शिवा काहीही घ्या) सोबत दर्शन घेतलं… 'चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत तिला भरभरून प्रतिसाद दिला आहे. हेही वाचा - Kiran Mane : 'माझ्याबाबतीतलं तिचं मत हलक्यात घेन्यासारखं नाय'; जुन्या वादावर पुन्हा व्यक्त झाले किरण माने प्राजक्ता माळी उत्तम अभिनेत्री आहेच पण एक सुजाण नागरिक म्हणून ती वेगवेगळ्या राजकीय विषयांवर भाष्य करताना देखील दिसून येते. कालच तिने स्वातंत्र्यदिनानिमित्त फोनवर 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम' म्हणण्याच्या निर्णयाला पाठींबा दर्शवला होता. आज तिला आपल्या परंपरा पाळताना पाहून चाहते खुश झालेत. अलीकडेच प्राजक्ता माळी 'रानबाजार' या वेब सीरिज मधील भूमिकेमुळे  चांगलीच चर्चेत आली होती. तिचे या भूमिकेसाठी कौतुक झाले होते. त्यानंतर आलेल्या 'वाय' या  सिनेमात  देखील प्राजक्तानं महत्वाची भूमिका निभावली होती. प्राजक्ता आता टेलिव्हिजनवर हास्यजत्रेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय आगामी काळातही तिचे प्रोजेक्ट्स रांगेत आहेत. याविषयी अभिनेत्री वेळोवेळी चाहत्यांना अपडेट्स देत असते.
First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या