मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Prajakta Mali: 'आजपासून फोनवर हॅलो बंद, वंदेमातरम सुरू'; स्वातंत्र्यदिनी प्राजक्ताचा मोठा निर्णय

Prajakta Mali: 'आजपासून फोनवर हॅलो बंद, वंदेमातरम सुरू'; स्वातंत्र्यदिनी प्राजक्ताचा मोठा निर्णय

शासनाच्या घरोघरी तिरंगा या मोहिमेला पाठिंबा देत अभिनेत्री प्राजक्ता माळीनं देशाच्या स्वातंत्र्यदिनी मोठा निर्णय घेतला आहे. तिच्या निर्णयामुळे तिचं प्रचंड कौतुक होताना दिसत आहे.

  मुंबई, 15 ऑगस्ट: सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्री आहेत मात्र त्यातील काही अभिनेत्री अशा आहेत ज्या केवळ त्यांचा अभिनयच नाही तर त्यांच्या विचारांमुळे, समाजाप्रती असलेल्या जाणीवेमुळे देखील प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. अशीच एक सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्तानं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकलीच परंतू प्राजक्ताची समाजकार्याची आवड, आजूबाजूला सुरू असलेल्या परिस्थितीवर तिची ठाम मत यामुळे देखील तिनं प्रेक्षकांनी मनं जिंकलीत. आज स्वातंत्र्यांच्या 75व्या वर्षी प्राजक्तानं सर्वांना शुभेच्छा देत नवा निश्चय केला आहे. भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यलयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी केला. त्याच्या या निर्णयाला अभिनेत्री प्राजक्ता माळीनं देखील पाठिंबा देत आज पासून फोनवर हॅलो न बोलता वंदेमारम् बोलण्याचा निर्णय घेतला. हेही वाचा - Om Bhutkar : मुळशी पॅटर्नच्या खतरनाक भूमिकेनंतर ओम भुतकर साकारणार 'ही' भूमिका; नव्या सिनेमाची घोषणा देशाच्या 75व्या स्वातंत्र्यदिनामित्त प्राजक्तानं देखील घरोघरी तिरंगा या मोहिमेला पाठिंब देत तिच्या घरी तिरंगा फडकवला आहे. तिरंग्याकडे पाहत असतानाचा फोटो शेअर करत प्राजक्तानं पोस्ट शेअर केली आहे. तिनं म्हटलंय, 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. स्वातंत्र्यदिन चिरायू होवो. माझ्या प्रिय भारताचं स्वातंत्र्य, ऐक्य, सहिष्णूता, संस्कृती, सर्व धर्म समभाव विचार, महानता , परंपरा जगाच्या अंतापर्यंत अबाधित राहो. ह्या कामी माझं आयूष्य खर्ची पडावं! ह्या कामी सर्व देशवासीयांनी झटावं..! आणि हो, आजपासून फोनवर हॅलो बंद वंदेमातरम् सुरू.  “देव देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती” ही भावना कधीही मरू नये हीच प्रार्थना'. सोबतचं प्राजक्तानं भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता देखील शेअर केली आहे. पाहा प्राजक्ताची पूर्ण पोस्ट.
  प्राजक्ताच्या या नव्या पोस्टवर आणि तिच्या नव्या निश्चयाचं तिच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे. प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झालं तर प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्राच्या दुसऱ्या सीझनमध्ये परत आली असून. हास्यजत्रेत पुन्हा त्याच ताकदीनं सूत्रसंचालन करताना दिसत आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Independence day, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या