मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Om Bhutkar : मुळशी पॅटर्नच्या खतरनाक भूमिकेनंतर ओम भुतकर साकारणार 'ही' भूमिका; नव्या सिनेमाची घोषणा

Om Bhutkar : मुळशी पॅटर्नच्या खतरनाक भूमिकेनंतर ओम भुतकर साकारणार 'ही' भूमिका; नव्या सिनेमाची घोषणा

Om Bhutkar

Om Bhutkar

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक चित्रपटांची घोषणा केली जात आहे. अभिनेता ओम भूतकरच्या चित्रपटाचीही आज घोषणा झाली आहे. तो या चित्रपटात अतिशय वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

  मुंबई, 15 ऑगस्ट : 'मुळशी पॅटर्न' या प्रचंड गाजलेल्या चित्रपटामधून प्रसिद्ध झालेला अभिनेता, लेखक म्हणजे ओम भुतकर. ओमने खरंतर बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. 'छोटा सिपाही' या चित्रपटासाठी बालकलाकार म्हणून त्याने पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. त्यानंतर त्याने फास्टर फेणे, आजोबा, देऊळ, बारायण, लेथ जोशी अशा चित्रपटांतून विविधांगी भूमिका निभावल्या आहेत. नेहमी त्याच्या अभिनयाचे  कौतुक होते. आता हा गुणी  अभिनेता पुन्हा एकदा अतिशय नवीन भूमिकेतून प्रेक्षकांना भेटायला सज्ज झाला आहे. आज भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अभिनेता ओम भुतकर याने त्याच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत घोषणा केली आहे. लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते  साने गुरुजी लिखित प्रसिद्ध कादंबरी  'श्यामची आई' हे पुस्तक सर्वपरिचित आहे. मराठी माणसाने  आयुष्यात एकदातरी 'श्यामची आई' ही  कादंबरी वाचलेली असते असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आता याच प्रसिद्ध कादंबरीवर आधारित  'श्यामची आई' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता  ओम भूतकर हा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.  ओम भूतकर या चित्रपटात साने गुरुजींची भूमिका साकारणार आहे.
  'शाळा' 'आजोबा' आणि 'केसरी' यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके हे 'श्यामची आई' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून या चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे कि, 'भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि  चित्रपटाची घोषणा केल्याच्या अगदी एक वर्षानंतर, मी तुमच्यासमोर  आमच्या 'श्यामची आई चित्रपटाचे पहिले  पोस्टर सादर करत आहे.' या पोस्टरमध्ये ओम भुतकर साने गुरुजींच्या  भूमिकेत दिसत आहे. हेही वाचा - Virajas kulkarni and Gautami Deshpande : सई आदित्यची जोडी पुन्हा दिसणार एकत्र; 'या' गाण्यात करणार रोमान्स अमृता अरुण राव या चित्रपटाची निर्मिती करणार असून श्यामची आई हा चित्रपट २०२३ या वर्षात प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक सुजय डहाके यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे,  स्पृहा जोशी यांच्यासारख्या प्रसिद्ध  कलाकारांनी कमेंट करत चित्रपटाला  शुभेच्छा दिल्या आहेत. ओम भुतकर आतापर्यंत अतिशय विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात ओम भुतकर खतरनाक गुंडाच्या भूमिकेत दिसला होता. आतापर्यंत ओम अशाच धाटणीच्या भूमिकांमध्ये दिसला होता. आता साने गुरुजींच्या भूमिकेत ओम कसा दिसणार, ही  भूमिका तो कशी साकारणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. साने गुरुजींच्या भूमिकेत ओम भूतकरला पाहायला प्रेक्षक उत्सुक झालेत.
  Published by:Nishigandha Kshirsagar
  First published:

  Tags: Independence day, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या