मुंबई, 29 एप्रिल- सुपरस्टार प्रभुदेवा यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. डान्स, अभिनयपासून ते दिग्दर्शनापर्यंत प्रत्येक क्षेत्रात प्रभुदेवांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतच प्रभुदेवा आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत असतात. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक चढउतार आलेले सर्वांनीच पाहिलं आहे. 2011 मध्ये प्रभूदेवा यांना त्यांची पहिली पत्नी रामलथसोबत अनेक वादविवादांना सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर 2020 मध्ये प्रभू देवाने हिमानी सिंह नावाच्या डॉक्टरशी लग्न केलं आहे. कोरोना काळात दोघांनीही गुपचूप लग्न केलं होतं. आपल्या लग्नाबाबत त्यांनी कोणालाही सांगितलं नव्हतं. प्रसिद्ध कोरिओग्राफरने लग्नाला एक वर्ष उलटूनही अधिकृतपणे याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाहीय.
पण आता पहिल्यांदाच प्रभुदेवा आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत एका ठिकाणी दिसून आले. त्यांचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हे वाचा: Salman Khan: ‘प्रेमाच्याबाबतीत मी फारच…’, तुटलेल्या ‘त्या’ रिलेशनशिप्सबद्दल पहिल्यांदाच बोलला सलमान खान ) अष्टपैलू कलाकार अशी ओळख असणारे प्रभुदेवा पुन्हा एकदा आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. प्रभुदेवा लग्नानंतर पहिल्यांदाच त्यांची दुसरी पत्नी हिमानी सिंगसोबत दिसून आले. नुकतंच हे जोडपं तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी पोहोचलं होतं. यादरम्यान प्रभूदेवा आपल्या पत्नीच्या सुरक्षेची काळजी घेत तिचा हात धरुन चालताना दिसले. प्रभूदेवांना पत्नी हिमानी सिंगसोबत पाहून चाहते प्रचंड आनंदी आहेत. या जोडप्याचा फोटो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी प्रभूदेवाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी हिमानीने आपल्या पतीसाठी एक व्हिडिओ बनवला होता. आणि त्यात तिने कोरिओग्राफरचं कौतुक केलं होतं. या व्हिडिओमध्ये, ती असं म्हणताना दिसली होती की, ‘सर्वजण तिची प्रशंसा करत असतात. पण तिला त्यांच्यातील प्रेमळ आणि काळजी घेण्याचा स्वभाव तसेच त्यांची विनोदबुद्धी आवडते. तिने पुढे सांगितलं की, लग्नाच्या तीन वर्षात ती खूप आनंदी आहे. तसेच प्रभुसोबत लग्न करुन आनंदी आयुष्य जगत असल्याचं आपल्याला अभिमान वाटत असल्याचंही तिने म्हटलं होतं’ सोबतच प्रभुदेवा प्रचंड मेहनती, आशावादी असल्याचंही हिमानीने म्हटलं होतं’.
व्यावसायिक आयुष्यबाबत सांगायचं तर, प्रभूदेवा शेवटचं मानसशास्त्रीय रोमँटिक थ्रिलर ‘बघीरा’ मध्ये दिसले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन अधिक रविचंद्रन यांनी केलं होतं. परंतु चित्रपट अपेक्षेप्रमाणे कमाल दाखवू शकला नव्हता. परंतु प्रभू देवाने आपल्या चाहत्यांना मात्र खुश केलं होतं. सोबतच या चित्रपटात प्रभूदेवा पहिल्यांदाच टक्कल असलेल्या नव्या लूकमध्ये झळकलं होते. यापूर्वी त्यांना कधीही अशा लूकमध्ये पाहण्यात आलं नव्हतं.