नुकतंच 'किसी का भाई किसी की जान' च्या निमित्ताने सलमान 'आपकी अदालत' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये सहभागी झाला होता.
यावेळी होस्ट रजत शर्मा यांनी त्याला त्याच्या प्रमोशन इव्हेन्टमधील 'मूव्ह ऑन' वक्तव्याववर प्रश्न विचारला होता.
यावर उत्तर देत सलमानने म्हटलं, 'प्रेमाच्याबाबतीत मी फारच कमनशिबी आहे. पुढे रजत शर्मांनी त्याला विचारलं सध्या तुझी जान कोण आहे?
यावर हसत हसतच सलमान म्हणाला, 'ज्या मुलींवर माझं प्रेम होतं, ज्यांना मला जान बनवायचं होतं, त्या सगळ्या मला भाऊ म्हणत आहेत. मग मी काय करणार आता'.