जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आदिपुरुष'ची रिलीज आधीच कोट्यवधीची कमाई, OTT प्लॅटफॉर्मवर कधी आणि केव्हा पाहाता येणार?

'आदिपुरुष'ची रिलीज आधीच कोट्यवधीची कमाई, OTT प्लॅटफॉर्मवर कधी आणि केव्हा पाहाता येणार?

सिनेमा रिलीज होण्याआधीच 'आदिपुरुष'चा  निर्माता मालामाल

सिनेमा रिलीज होण्याआधीच 'आदिपुरुष'चा निर्माता मालामाल

अभिनेता प्रभास, कृती सेनन आणि मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे प्रमुख भूमिकेत असलेला आदिपुरूष हा सिनेमा संपूर्ण देशात रिलीज होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. सिनेमा रिलीज होण्याआधीच मात्र कोट्यवधी कमाई केली आहे..कशी ते वाचा सविस्तर..

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 जून- अभिनेता प्रभास, कृती सेनन आणि मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे प्रमुख भूमिकेत असलेला आदिपुरूष हा सिनेमा संपूर्ण देशात रिलीज होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या 16 जूनला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट जवळपास 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपटाची कमाई जास्तीत जास्त व्हावी यासाठी निर्मात्यांनी एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मशी शेकडो कोटी रुपयांचा करार केला आहे. सध्या या चित्रपटाच्या व्हीएफएक्सची आणि रामायणाच्या मॉर्डन अडेप्टेशनची चर्चा जोरात सुरू आहे. पण या सिनेमाची ओटीटी डील ऐकून तुमचे डोळे भिरतील..हे मात्र नक्की.. आदिपुरुष सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 52 दिवसांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. यासाठी निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमशी करार केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅमेझॉनने आदिपुरुषच्या निर्मात्यांना जवळपास 250 कोटी रुपये दिले आहेत. भारतात अॅमेझॉन आणि नेटफ्लिक्स यांच्यात जोराची स्पर्धा आहे. त्यामुळे सिनेमा रिलीज होण्याआधीच निर्मात्यांना खूप फायदा झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, आदिपुरुषने आपले म्युझिक, सॅटेलाइट आणि इतर डिजिटल राइट्स विकून तब्बल 432 कोटी रुपये कमावले आहेत. वाचा- भांडता-भांडता प्रेमात पडले, वय होतं फार कमी; राम-उपासनाची फिल्मी Love Story पहिल्या दिवशी 100 कोटीचा कमीई करण्याची शक्यता आदिपुरुष सिनेमाची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. 11 जूनपासून या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे. रिपोर्टनुसार, आतापर्यंत दीड लाख अॅडव्हान्स तिकिटे बुक करण्यात आली आहेत. म्हणजेच 5 कोटींची तिकिटे विकली गेली आहेत. हा चित्रपट पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये 100 कोटींची कमाई करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

News18लोकमत
News18लोकमत

आदिपुरुषाची कथा काय आहे ? आदिपुरुषमध्ये सुपरस्टार प्रभास मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामाची भूमिका साकारत आहे. क्रिती सेनन माता सीता म्हणजेच जानकीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सैफ अली खान लंकापती रावणाची दमदार व्यक्तिरेखा साकारत आहे. मराठी अभिनेता देवदत्त नागे बजरंगबलीची भूमिका साकारत आहे. तर सनी सिंगला पहिल्यांदाच मोठी भूमिका मिळाली आहे. लक्ष्मणची भूमिका तो साकारणार आहे. रिकामी सीट भगवान हनुमान यांच्यासाठी आदिपुरूषच्या निर्मात्यांनी सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान प्रत्येक शोला प्रत्येक ठिकाणी एक सीट रिकामी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही रिकामी सीट भगवान हनुमान यांच्यासाठी असणार आहे. आदिपुरूष सिनेमाचं एकूण बजेट 600 कोटी रुपये आहे. सिनेमानं रिलीज आधीच चर्चेत आहे. यापूर्वी तिरुपतीच्या मोठ्या ग्राऊंडमध्ये आदिपुरूषचा भव्य ट्रेलर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अभिनेता प्रभासची साऊथमध्ये किती क्रेझ आहे हे यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळालं. सिनेमाच्या ट्रेलर लाँच वेळी झालेली गर्दी पाहता सिनेमा बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी छप्पर तोड कमाई करणार असल्याचं दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात