प्रभाससोबत रिलेशिपमध्ये आहे अनुष्का, शोधतेय नवं घरं?

प्रभाससोबत रिलेशिपमध्ये आहे अनुष्का, शोधतेय नवं घरं?

प्रभास आणि अनुष्का त्यांच्या नात्याबाबत सध्या गंभीर असून हे दोघंही या नात्याला पुढे नेण्याचा विचार करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : साऊथ सुपरस्टार प्रभास सध्या त्याचा आगामी सिनेमा साहोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तो एका अंडरग्राउंड पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे तर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’च्या यशानंतर प्रभासच्या बॉलिवूड चाहत्यांमध्येही वाढ झाली. या सिनेमातील प्रभास आणि अनुष्का शेट्टीची जोडी तुफान गाजली. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चाही खूप गाजल्या. मात्र या दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आम्ही फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहोत यापलिकडे या नात्याविषयी काहीही बोलणं त्यांनी नेहमीच टाळलं. मात्र या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना आता पुन्हा एकदा वेग आला आहे. हे दोघंही त्यांच्या 10 वर्षांच्या मैत्रीच्या नात्याला नवं नाव देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार प्रभास आणि अनुष्का त्यांच्या नात्याबाबत सध्या गंभीर असून हे दोघंही या नात्याला पुढे नेण्याचा विचार करत आहेत. एवढंच नव्हे तर अनुष्का आणि प्रभासनं लॉस एंजेलिसमध्ये घर घेण्याच्या विचारत आहेत. सध्या प्रभास किंवा अनुष्काकडून याबाबत कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. पण जर हे वृत्त खरं असल्यास लवकरच ही जोडी त्यांचं नातं ऑफिशिअल करतील असं दिसतं.

ईदच्या दिवशी सारा अली खान पोहोचली थायलंडच्या मंदिरात!

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas Anushka (@prabhas_anushka_fanclub) on

साहो सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी प्रभासला दुखापत झाली होती. त्यानंतर अनुष्कानं सेटवर जाऊन त्याची भेट घेत असे स्टंट करताना डबल बॉडीचा वापर करण्याचा सल्ला त्याला दिला होता. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ज्याचा प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला. हा सिनेमा सुरुवातीला 15 ऑगस्टला रिलीज होणार होता मात्र नंतर त्याची रिलीज डेट बदलण्यात आली. त्यामुळे आता हा सिनेमा येत्या 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

‘तारक मेहता...’मध्ये पुन्हा एकदा होणार दयाबेनची एंट्री, जेठालालनं केला खुलासा

साहोचे दिग्दर्शक सुजीत यांनी या सिनेमातील सर्व स्टंट सीनसाठी खास मेहनत घेतली आहे. या सिनेमातील अनेक सीन्स हे हॉलिवूडच्याही स्टंटना सुद्धा मागे टाकताना दिसतात. प्रभासनंही या सर्व अ‍ॅक्शन सीन्स खूप मेहनत घेतली असून त्यानं सिनेमामधील त्याच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर यांच्यासारखे दिग्गज अभिनेते खलनायकांच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच प्रकाश बेलावडी, मंदिरा बेदी आणि मुरली शर्मा यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

शारीरिक शोषण, अश्लील कमेंट, बोल्ड फोटो... आईच्या तक्रारीनंतर पलकनं सांगितलं सत्य

======================================================================

SPECIAL REPORT : बोगस बॉलिवूड, मुंबईतून पैसा हवा पण महापुराला मदत नको?

Published by: Megha Jethe
First published: August 13, 2019, 6:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading