Home /News /entertainment /

एका फोटोमुळे संपलं माहिकाचं करिअर; Pornstar म्हणून झाली होती ट्रोल

एका फोटोमुळे संपलं माहिकाचं करिअर; Pornstar म्हणून झाली होती ट्रोल

माहिका अभिनयासोबतच काही स्वयंसेवी संस्थांसोबतही संलग्न आहे. ती वेश्या वस्तीत काम करणाऱ्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना मदत करत होती.

    मुंबई 26 जुलै: ‘रामायण’ (Ramayana) या मालिकेतून प्रकाशझोतात आलेली माहिका शर्मा (Mahika Sharma) छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती जवळपास गेलं एक दशक मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. तिने ‘मर्दानी’, ‘पोलीस स्टोरी’ यांसारख्या काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. (Mahika Sharma Movie) मात्र गेल्या काही काळात पॉर्नस्टार म्हणत तिला ट्रोल करण्यात आलं. एका पॉर्नस्टारसोबत असलेल्या मैत्रीमुळे तिच्या करिअरचे तीनतेरा वाजले. आज माहिकाचा वाढदिवस आहे. (Mahika Sharma Birthday) त्यानिमित्ताने जाणून घेऊया माहिकासोबत नेमकं घडलं तरी काय होतं? करिअर फ्लॉप पण जगतोय राजासारखा; ‘मोहब्बतें’ फेम जुगल हंसराज करतोय काय? माहिका अभिनयासोबतच काही स्वयंसेवी संस्थांसोबतही संलग्न आहे. ती वेश्या वस्तीत काम करणाऱ्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना मदत करत होती. त्यावेळी 'द मॉडर्न कल्चर' या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिची ओळख जॉनी सिन्सशी झाली. तो एक जगप्रसिद्ध पॉर्नस्टार आहे. माहिकाने जॉनीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र या फोटोंमुळे तिचं नाव पॉर्न इंडस्ट्रीशी जोडण्यात आलं. सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवण्यात आली. अन् या ट्रोलिंगचा परिणाम तिच्या करिअरवर देखील झाला. ‘..याला म्हणतात सौंदर्य’; नैनाच्या BOLD फोटोंवर पाकिस्तानातून कौतुकाचा वर्षाव त्यावेळी माहिका FIR या मालिकेत काम करत होती. मात्र या मालिकेतून तिला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तिला फारसं काम मिळालेलं नाही. माहिकाने वृत्तमाध्यमांना मुलाखती देऊन पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करत नसल्याचं अनेकदा स्पष्ट केलं आहे. परंतु तरी देखील आजही तिला पॉर्नस्टार म्हणूनच ट्रोल केलं जातं. अशा प्रकारे जॉनीसोबतच्या एका फोटोमुळे माहिकाच्या करिअरचे तीनतेरा वाजले.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment, Tv actress

    पुढील बातम्या