मुंबई, 23 सप्टेंबर : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) नेहमीच आपल्या बोल्ड छायाचित्र आणि व्हिडीओसाठी चर्चेत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या लग्नामुळे चर्चिली जात आहे. काही दिवसांपूर्वीच ती आपल्या बॉर्यफ्रेंड सॅम बॉम्बे (Sam Bombay) सोबत लग्नबंधनात अडकली आहे. हनिमूनला जाण्यापूर्वीचे फोटो तिने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले होते.
लग्नाच्या 21 दिवसांनंतर एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. पूनम पांडेने पतीवर माहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. इतकचं नाही तर हे प्रकरण इतकं गंभीर झालं आहे की पोलिसांनी तिचा पती (Poonam Pandey Husband Arrested) सॅम बाँम्बे याला अटक केली आहे.
Goa: Canacona Police today arrested Sam Bombay, husband of actress Poonam Pandey for molesting, assaulting and threatening to kill her, says South Goa SP Pankaj Kumar Singh
मिळालेल्या माहितीनुसार पूनम पांडे हिचा पती सॅम बॉम्बे याला मंगळवारी गोव्यात अटक करण्यात आली. अभिनेत्रीने पतीविरोधात छेडथाड, जीवे मारण्याची धमकी व मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना दक्षिण गोव्यातील कैराकोना गावातील आहे. येथे पूनम पांडे एका चित्रपटाचं शूटिंग करीत होती. कैनाकोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी सांगितलं की, पांडे यांनी सोमवारी रात्री उशिरा तक्रार दाखल केली. तिचा पती सॅम बॉम्बे याने तिच्यासोबत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पूनम पांडेंनी सांगितले.