दिल्लीच्या नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आपलं नशीब आजमवण्यासाठी नवाझ मुंबईमध्ये आला. अभिनयाचं प्रमाणपत्र मिळालेल्या नवाझला मुंबईमध्ये राहायला मात्र जागा नव्हती. त्यावेळी त्यानं त्याच्या एका सिनियर रिक्वेस्ट करून त्याच्या घरात राहण्याची सोय केली. पण त्याला या ठिकाणी राहण्यासाठी अट होती ती म्हणजे त्या मित्राला दोन वेळचं जेवण बनवून खाऊ घालायचं. आपल्या स्ट्रगलच्या काळात नवाझुद्दी काहीही करायला तयार होता. त्यानं वॉचमनची नोकरी सुद्धा केली. सुरुवातील सिनेमांमध्ये चोर, वेटर सारख्या भूमिका त्याच्या नशीबी आल्या पण त्यावेळीही त्यानं हार मानली नाही. नवाझ मुंबईमध्ये आला त्यावेळी खर्चासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते ना कोणती नोकरी. खूप प्रयत्न केल्यावर त्याला एक वॉचमनचा जॉब मिळाला. पण त्याचं सेक्युरिटी अमाउंट भरण्यासाठीही त्यानं मित्राकडून पैसे उधारिवर घेतले होते. नवाझला नोकरी तर मिळाली पण यासाठी लागणारी शारिरिक क्षमता त्याच्याकडे नव्हती. तो कामावर नेहमीच बसून राहायचा. त्याची ही गोष्ट मालकाच्या लक्षात आल्यावर त्याला या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. त्यात त्याचं सेक्युरिटी अमाउंट पण त्याला परत दिलं नाही.
नवाझला सर्वात मोठा ब्रेक मिळाला तो अनुराग कश्यपच्या 'ब्लॅक फ्रायडे' या सिनेमातून. त्यानंतर फिराक, न्यूयॉर्क आणि देव डी या सिनेमांमध्ये त्यानं महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. गँग्स ऑफ वासेपूर रिलीज झाला आणि नवाज सुपरस्टार झाला. त्यानंतर बंदूकबाजमधला बाबू मोशाय, सेक्रेड गेम्सचा गणेश गायतोंडे या भूमिकांनी नवाझुद्दीनला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. एक वेळ होता ज्या नवाझला एक वेळच्या जेवणाची भ्रांत होती तो आज बॉलिवूडचा सुपरस्टार झाला आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood