जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Vaishali takkar: अभिनेत्री वैशाली टक्करच्या आत्महत्येबाबत मोठा खुलासा; खरं कारण आलं समोर

Vaishali takkar: अभिनेत्री वैशाली टक्करच्या आत्महत्येबाबत मोठा खुलासा; खरं कारण आलं समोर

वैशाली ठक्कर

वैशाली ठक्कर

अभिनेत्री वैशाली टक्करच्या घरातून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यावरून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं कारण समोर आलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 ऑक्टोबर : आज टीव्ही विश्वात खळबळ उडाली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम वैशाली ठक्करच्या आत्महत्येच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. वैशालीने अचानक हे पाऊल कसे उचलले हे त्याच्या जवळच्या लोकांना समजू शकलेले नाही. अभिनेत्रीने आपल्या इंदोरच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीने सुसाईड नोटसुद्धा लिहली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली  टक्कर गेल्या एक वर्षांपासून इंदोरमध्ये राहात होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येची माहिती समोर येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना वैशालीच्या मृतदेहा शेजारी सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे. आता त्या नोटमधून तिच्या मृत्यूचं खरं  कारण समोर आलं  आहे. टीव्ही अभिनेत्री वैशाली  टक्कर हिच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी एमवाय हॉस्पिटलमध्ये पाठवला. मृत अभिनेत्रीकडून पोलिसांना एक वैयक्तिक डायरीही सापडली असून, त्यातून तिने आत्महत्या का केली त्याच कारण समजत आहे. हेही वाचा - मोठी बातमी! ‘ये रिश्ता क्या केहेलाता है’ फेम अभिनेत्री वैशाली टक्करची आत्महत्या पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली आहे. बॉयफ्रेंडने धोका दिल्यामुळेच वैशालीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, चौकशीनंतरच त्याबाबतचा खुलासा होणार आहे.तिच्याकडे मिळालेल्या चिठ्ठीवरून तिचं कुणाशी तरी प्रेमप्रकरण सुरू असल्याचं दिसून येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. प्रेम प्रकरणात अपयश आल्याने तिने आत्महत्या केली असावी असं सांगितलं जात आहे.

News18लोकमत
News18लोकमत

वैशाली मध्यप्रदेशाची राजधानी इंदौर येथे राहत होती. सात वर्ष मायानगरी मुंबईत राहिल्यानंतर गेल्यावर्षी ती इंदौरमध्ये येऊन राहत होती. तिचं शिक्षणही इंदौरच्या शाळा आणि महाविद्यालयात झालं होतं. तिने आतापर्यंत  मनमोहिनी, सुपर सिस्टर्स, विष और अमृत आदी सुपरहीट मालिकांमध्ये तिने काम केलं होतं. गेल्यावर्षी तिचा डॉ. अभिनंदन सिंह यांच्याशी साखरपुडा झाला होता. पण त्यांचं हे नातं अधिककाळ चाललं नाही. त्यामुळे त्यांनी साखरपुडा मोडला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात