मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मोठी बातमी! 'ये रिश्ता क्या केहेलाता है' फेम अभिनेत्री वैशाली टक्करची आत्महत्या

मोठी बातमी! 'ये रिश्ता क्या केहेलाता है' फेम अभिनेत्री वैशाली टक्करची आत्महत्या

वैशाली ठक्कर

वैशाली ठक्कर

टीव्ही इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'ए रिश्ता क्या केहेलाता है' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली टक्करने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 16 ऑक्टोबर- टीव्ही इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'ये रिश्ता क्या केहेलाता है' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली टक्करने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेत्रीने आपल्या इंदोरच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीने सुसाईड नोटसुद्धा लिहली आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्कर गेल्या एक वर्षांपासून इंदोरमध्ये राहात होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येची माहिती समोर येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांना वैशालीच्या मृतदेहा शेजारी सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजाजी नगर परिसरातील पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. अद्याप अभिनेत्रीच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाहीय. परंतु पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असल्याने लवकरच या घटनेचा उलघडा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.वैशाली टक्करने इंदोरमधील स्वतः च्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने सेलेब्रेटींसह तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

(हे वाचा: Arun Bali Death: 3 इडियट्स फेम ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचं निधन;झाला होता दुर्मिळ आजार )

वैशाली टक्कर करिअर-

वैशाली टक्करने 2015 मध्ये 'ये रिश्ता क्या केहेलाता है' या लोकप्रिय मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेत तिने संजना ही भूमिका साकारली होती. पहिल्याच मालिकेतून वैशालीला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेनंतर ती लगेचच 'ये है आशिकी' या कलर्स वाहिनीवरील मालिकेत दिसली होती.त्यांनतर वैशाली टक्करने कलर्स वाहिनीवरील 'ससुराल सिमर का' मालिकेत काम केलं होतं. यामध्ये तिने सिमर अर्थातच दीपिका कक्करच्या लेकीची अंजलीची भूमिका साकारली होती. तसेच वैशालीने लाल इश्क, सुपर सिस्टर, मनमोहिनी सीजन २ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. वैशालीने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात अँकरिंगपासून केली होती. वैशाली ही मूळची मध्य प्रदेशातील उज्जैनची आहे.

वैशालीने मोडला होता साखरपुडा-

वैशाली टक्करने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात साखरपुडा केला होता. अभिनेत्रीने आपल्या साखरपुड्याचा एक व्हिडीओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. अभिनेत्रीने आपल्या कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या उपस्थित साखरपुडा उरकला होता. परंतु अभिनेत्रीने अवघ्या एका महिन्यातच साखरपुडा मोडला होता. आणि आपण आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अभिनेत्रीने आपल्या साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन हटवला होता.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Tv actress