मलायकानं हा फोटो शेअर करत लिहिलं - डावीकडं पाहा, उजवीकडं पाहा, पुढं पाहा...बास फक्त प्रकाश कॅच करा. मलायकाचा हा फोटो तिची बहिण अमृतानं काढला आहे. मलायकानं कॅप्शनमध्ये बहिणीला फोटो क्रेडिट देत तिच्या फोटोग्राफीचं कौतुकंही केलं आहे. बहिण अमृताच्या वाढदिवशी मलायकानं लिहिली होती खास पोस्ट - नुकतंच मलायकानं बहिण अमृताच्या वाढदिवसाला काही अनसीन फोटो शेअर केले होते.मलायकानं अमृतासोबत फोटो शेअर करत लिहिलं होतं, की नेहमी तुझ्या सोबत असेल. आशा आहे की आपण नेहमी सोबत हसू, रडू, भांडू, खाऊ, जेवण बनवू आणि फिरू. खूप सारं प्रेम. हॅपी बर्थडे. अमृता आणि मलायका अनेकदा एकमेकींसोबत वेळ घालवताना दिसतात. अनेकदा त्या आपले फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असतात.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Malaika arora, Photoshoot