Home /News /entertainment /

Ranveer Singh पुन्हा होणार न्यूड?; 'या' प्रसिद्ध संस्थेनं दिली मोठी ऑफर

Ranveer Singh पुन्हा होणार न्यूड?; 'या' प्रसिद्ध संस्थेनं दिली मोठी ऑफर

रणवीर सिंहनं केलेलं न्यूड फोटोशूटचं वातावरण शांत होत नाही तोच त्याला आणखी एका मासिकाकडून न्यूड फोटोशूटसाठी ऑफर आली आहे.

  मुंबई, 5 ऑगस्ट: अभिनेता रणवीर सिंहनं नुकतंच न्यूड फोटोशूट केलं आहे (Ranveer Singh Nude Photoshoot). त्यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. त्याच्या या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवलेली पहायला मिळाली. न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहवर एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. मुंबई चेंबुर पोलीस ठाण्यात त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली असून त्याच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. हे वातावरण शांत होत नाही तोच रणवीरला आणखी एका न्यूड फोटोशूटसाठी ऑफर आली आहे. रणवीर सिंहनं केलेलं न्यूड फोटोशूटचं वातावरण शांत होत नाही तोच त्याला आणखी एका मासिकाकडून न्यूड फोटोशूटसाठी ऑफर आली आहे. PETA या संस्थेला रणवीरने 'सर्व प्राणी आणि समान भाग - शाकाहारी प्रयत्न करा' या टॅगलाइनसह जाहिरात मोहीम करायची आहे. यासाठी त्यांनी रणवीरला ऑफर दिली आहे. प्राण्यांबद्दल लोकांमध्ये दया आणि करुणा वाढवण्यासाठी तुम्ही पेटा, इंडियाच्या बोल्ड जाहिरातीत सहभागी होण्यास तयार आहात का?, असं या संस्थेनं विचारलेलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by News18.com (@cnnnews18)

  पेटा इंडियाचे हे आमंत्रण रणवीर नाकारतो की स्वीकारतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. रणवीर सिंग इतरांना शाकाहारी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि प्राणी वाचवण्याच्या मोहिमेला पुढे नेण्यासाठी योग्य आहे. जर रणवीर सिंह त्याचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला तर तो अनुष्का शर्मा, जोक्विन फिनिक्स, कार्तिक आर्यन आणि नताली पोर्टमॅन यांसारख्या शाकाहारी सेलिब्रिटींमध्ये सामील होईल. हेही वाचा -  Raqesh Bapat and Shamita Shetty : ब्रेकअप नंतरही राकेश आणि शमिता आले एकत्र; व्हिडीओ तुफान व्हायरल दरम्यान, रणवीर सिंहने पेपर मॅगझिनसाठी हे अतिशय बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये अभिनेता पूर्णपणे कपड्यांशिवाय दिसत आहे. कार्पेटवर बसून रणवीर वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसून येत आहे. रणवीरनं केलेल्या न्यूड फोटोशूटला अनेक मोठमोठ्या कलाकरांनी पाठिंबा दर्शवला आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Bold photoshoot, Bollywood, Ranveer sigh, Social media

  पुढील बातम्या