मुंबई, 25 ऑक्टोबर : बी टाऊनमध्येही दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी दिवाळी पार्टी दिली आहे ज्यात अनेक सेलेब्स हजेरी लावताना दिसले आहेत. दरम्यान, भूमी पेडणेकरने नुकतीच दिवाळी पार्टीही दिली ज्यामध्ये अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या पार्टीत अजय देवगणची मुलगी न्यासा देवगणही पोहोचली होती. या पार्टीत दिसल्यापासून सोशल मीडियावर तिची जोरदादर चर्चा पहायला मिळत आहे. याशिवाय तिची तुलना अभिनेत्री जान्हवी कपूर सोबत केली जात आहे. हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात पार्टीत पोहोचलेली न्यासा पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसली. तिला पाहून अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. न्यासाचा बदलेला लुक पाहून अनेकांनी तिला जान्हवी कपूरच समजले. जान्हवी कपूर आणि न्यासा कपूर सारख्या दिसण्याबद्दल अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. शस्त्रक्रियांनंतर न्यासा जान्हवीसारखी दिसू लागली, असल्याचंही अनेकजण कमेंट करत आहे.
एका यूजरवर कमेंट करताना लिहिले की, ‘जान्हवी आणि तिचे सर्जन सेम आहेत.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘तिने नाकाची शस्त्रक्रिया केली आहे.’ त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, ‘2 ऑक्टोबरला कुठे होता’. याशिवाय अनेक यूजर्स न्यासाच्या लूकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
न्यासा स्टार किड अजूनही फिल्मी जगापासून दूर आहे. एकीकडे अनन्या, सारा आणि जान्हवीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. तर न्यासा अजूनही रुपेरी पडद्यापासून दूर आहे. असे असूनही तिचे फॉलोअर्स मोठ्या संख्येने आहेत. मित्रांसोबत अनेकदा पार्टी करताना तिचे फोटो व्हायरल होतो. जान्हवीला आणि न्यासाला अनेकदा पार्टी करताना एकत्र स्पॉट केले आहे. न्यासा देवगन आणि जान्हवी कपूर एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. काही काळापूर्वी न्यासा देवगन आणि जान्हवी कपूर नेदरलँडमध्ये त्यांच्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसल्या होत्या. अजय देवगणची लाडकी न्यासा देवगण परदेशात शिकते. तिचा हॉट लूक अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत येतो.