मुंबई, 21 एप्रिल : बॉलिवूड गायक सोनू निगम (Sonu Nigam) लॉकडाऊनमुळे दुबईमध्ये त्याच्या परिवारासह अडकला आहे. दुबईत शिक्षण घेणाऱ्या त्याच्या मुलाला भेटायला गेल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा झाली. परिणामी त्याला भारतामध्ये परतता आलं नाही. याची माहिती सोनू निगमने सोशल मीडियावर दिली आहे. दरम्यान आज सोनू निगम सोशल मीडियावर एका वेगळ्या कारणासाठी ट्रेंड होत आहे. यासाठी कारण आहे 3 वर्षांपूर्वी विवादात सापडलेले सोनू निगमचं ट्वीट.
(हे वाचा-विकी कौशल, राजकुमार रावची सोसायटी सील; डॉक्टरची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह)
3 वर्षांपूर्वी 2017 मध्ये सोनू निगमने 'अजान'बाबत वादग्रस्त ट्वीट केलं होतं. त्यानंतर त्याने त्याचं ट्विटर अकाउंट डिअॅक्टीव्हेट केले होते. मात्र सध्या तो दुबईमध्ये गेल्यानंतर त्याच्या ट्विटचे स्क्रीनशॉट पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागले आहेत. एवढच नव्हे तर दुबई पोलिसांनी सोनू निगमला अटक करावी अशी मागणी देखील ट्विटरवर होत आहे. अजानमुळे त्रस्त होत सोनू निगमने हे ट्वीट केल्याने दुबईमध्ये त्याच्यावर योग्य कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
@Dubai @DubaiPoliceHQ @DXBMediaOffice @DubaiPressClub @rta_dubai #sonunigam bollywood singer have problem with azan voice and daily he is telling something against muslim can you please solve his problem he is in dubai right now https://t.co/vOfVhlAvT4
— Mohammad Mazhar (@Mohamma98300069) April 20, 2020
@DubaiPoliceHQc you immediately arrest #SonuNigam. This has insulted our Prophet. In tweet, tomorrow you will have to answer on the Day of Allah also👇 pic.twitter.com/bi5Ji6HGD5
— mdanishadv (@Mdanishadv) April 20, 2020
सोनू निगमने एप्रिल 2017 मध्ये केलेल्या त्या वादग्रस्त ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, 'मी एक हिंदू आहे. पण मला सुद्धा अजानच्या आवाजाने उठावं लागतं. भारतामध्ये ही जबरदस्ती संपायला पाहिजे.' त्याचे हे ट्वीट पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. दरम्यान ट्विटरवर सोनू निगमबाबत काही मीम्स देखील बनत आहेत तर #सोनू_निगम_तुम_कहाँ_हो हा हॅशटॅग सुद्धा पहिल्या क्रमांकावर बराच वेळ ट्रेंडिग आहे.
He is in Dubai… Deactivated his account. #सोनू_निगम_तुम_कहाँ_हो pic.twitter.com/AFIcw5zNug
— काकावाणी 2.0 (@007AliSohrab) April 21, 2020
Sonu Nigam right now:😂😜 pic.twitter.com/ucLkAnDZWa — Abdul Basit (@AbdulTheWriter) April 21, 2020
सोशल मीडियावर जुने स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याने सोनू निगमच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.