शुभांगी अत्रेनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती 'भाभीजी घरपर है' या मालिकेमुळे या मालिकेतील 'अंगुरी' या पात्राने ती घराघरात पोहोचली. शुभांगीचं लग्नं अवघ्या 19 वर्षात झालं होतं. तिचा जन्म 1 एप्रिल 1981 मध्ये एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. तिला लहानपणापासूनचं अभिनयाचं वेड होतं. मात्र तिचं हे स्वप्न लग्नानंतर पूर्ण झालं.
एका मुलाखतीदरम्यान शुभांगीनं म्हटलं होतं की तिचा पती एका जाहिराती कंपनीमध्ये काम करत होता. तिनं त्यांच्यासाठी एका जाहिरातीत काम केलं होतं. त्यांनतर त्यांच्या फोटोग्राफरने तिला चित्रपटांत काम करण्याचा सल्ला दिला होता. शुभांगीनं आपल्या मुलीच्या जन्मानंतर अभिनयाला सुरुवात केली. 2007 मध्ये ती पहिल्यांदा 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत झळकली होती.
त्यांनतर शुभांगीनं करम अपना अपना, ये रिश्ता क्या कहालाता है, दो हंसो का जोडा, चिडियाघर, गुलमोहर गार्डन सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. शिल्पा शिंदेनं अतर्गत वादामुळे भाभीजी घरपर है ही मालिका सोडली. आणि त्यांनतर 2016 मध्ये यात शुभांगी अत्रेची वर्णी लागली. आणि या मालिकेमुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.