बॉलिवूड अभिनेत्रीकडून शिवाजी महाराजांवर वादग्रस्त पोस्ट, सोशल मीडियात खळबळ

बॉलिवूड अभिनेत्रीकडून शिवाजी महाराजांवर वादग्रस्त पोस्ट, सोशल मीडियात खळबळ

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट शेअर केली. तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर एक वेगळाच वाद सुरू झाला

  • Share this:

मुंबई, 03 जून- बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सोशल मीडियावर चर्चेत राहत आहे. काही दिवसांपूर्वी सुपरस्टार कमल हसन यांनी स्वतंत्र्य भारताचा पहिला दहशतवादी नथुराम गोडसे असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर आक्षेप घेत पायलने स्वतंत्र्य भारताचा पहिला दहशतवादी गोडसे नसून पाकिस्तानची निर्मिती केलेले मोहम्मद अली जिना असल्याचं तिने ट्विटरवर म्हटलं होतं.

तिच्या या ट्वीटवर काहींनी तिचं कौतुक केलं तर काहींना तिचं हे मत पटलं नसलं तरी पायलने आपला मुद्दा ठामपणे मांडला. पण आता तिचा हाच आत्मविश्वास तिला अडचणीत आणताना दिसत आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट केली. तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर एक वेगळाच वाद सुरू झाला असून पायलचं ही पोस्ट तिला अडचणीत आणताना दिसत आहे. शिवाजी महाराज हे मुळचे क्षत्रिय नसून ते शुद्र जातीत जन्माला आले होते असं विधान तिने या पोस्टमध्ये केलं आहे.

Death Anniversary : जिया खाननं आत्महत्या केली त्या रात्री नेमकं काय घडलं होतं
 

View this post on Instagram
 

Was #chhatrapatishivajimaharaja born in #shudra varna in family of farmers & by sacred thread ceremony & remarriage to his spouse made a #kshtriaya so that he could be coronated #King We are ASKING this question to everyone ? So people from 1 Varna could go 2 another Varna if they acquired that skill So NO casteism existed in #SanatanDharm ?? Why are Marathas given #Reservations in Maharashtra??? #payalrohatgi #SangramSingh


A post shared by Team Payal Rohatgi (@payalrohatgi) on

'जे मी भोगले ते यांना भोगायला लावू नका, मुलींना कधी डान्सर करू नका...'

पायलने एकंदरीत शिवाज महाराज आणि मराठा आरक्षणावर आपलं मत देत मुक्ताफळं उधळली आहेत. ट्विटर, इन्स्टाग्रामवर तिने स्वतःचे आणि पती संग्राम सिंगचे फोटो शेअर करत त्यावर कॅप्शनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे तसेच महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिलं असा प्रश्नही तिने विचारला आहे.

चाहता असावा तर असा! चाहत्याने सलमानसाठी केलं हे खास काम

दरम्यान, पायलचं नाव नथुराम गोडसेची पाठराखण केलेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आलं होतं. तिने कमल यांच्या वक्तव्याचा समाचार घेत, कमल यांना म्हातारचळ लागलं आहे असं म्हटलं होतं. तिने आपला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर  करत ‘कमल यांना दहशतवाद आणि खून याच्यातला फरक कळत नाही. स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी गोडसे नसून जिना होते,’ असं म्हटलं होतं.


सलमान-कॅटची खास केमिस्ट्री, भारत सिनेमानिमित्त कतरिना कैफ EXCLUSIVE

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2019 10:57 AM IST

ताज्या बातम्या