Death Anniversary : जिया खाननं आत्महत्या केली त्या रात्री नेमकं काय घडलं होतं

बॉलिवूड अभिनेत्री जिया खाननं 3 जून 2013 मध्यये वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आत्महत्या करून जीवन संपवलं.

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 09:32 AM IST

Death Anniversary : जिया खाननं आत्महत्या केली त्या रात्री नेमकं काय घडलं होतं

मुंबई, 03 जून : बॉलिवूड अभिनेत्री जिया खाननं 3 जून 2013 मध्यये वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आत्महत्या करून जीवन संपवलं. पण अद्याप तिच्या मृत्यूचं रहस्य उलगडलेलं नाही जियाच्या आत्महत्या प्रकरणात तिचा कथित बॉयफ्रेंड सूरज पंचोलीला अटक करण्यात आली. सूरजवर जियाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यासाठी त्याला तुरूंगवासही भोगावा लागला आहे. सध्या सूरज जमिनावर बाहेर आला असला तरी पण जिया खान प्रकरण आजही संपलेलं नाही. याचा खटला अजूनही सुरू आहे.

...म्हणून 'भारत'साठी कतरिना कैफनं 'स्ट्रीट डान्सर'ला केलं गुडबाय

जिया खानचं खरं नाव नफीसा रिजवी खान होतं. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सूरजनं तो आणि जिया एकमेकांना फेसबुकच्या माध्यमातून भेटल्याचं आणि काही काळातच एकमेकांचे चांगले मित्र बनले असल्याचं सांगितलं होतं. पण नुकत्याच सीबीआयच्या चार्जशीटमधून जियाच्या आत्महत्येविषयी काही नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. जियाच्या मृत्यूपूर्वी सूरजसोबतचे तिचे संबंध अतिशय बिघडलेले होते. असा खुलासा या चार्जशीटवरून झाला आहे.

चाहता असावा तर असा! चाहत्याने सलमानसाठी केलं हे खास काम

जिया आणि सूरजचा प्रेमाचं नातं काही काळानं तिरस्कारात बदलत गेलं. पण जियाच्या मृत्यूच्या एक तास अगोदर सूरजनं तिला पाठवलेले मेसेज सर्वांनाच चक्रावून टाकतील असे होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार जियाच्या मृत्यूच्या एक तास अगोदर सूरजनं तिला 10 मेसेज पाठवले होते. ज्यात अतिशय वाईट भाषा आणि शिव्यांचा वापर करण्यात आला होता.

Loading...

GQ 100 Best Dressed Awards- कतरिना कैफचा हॉट लुक पाहिलात का?

सीबीआयच्या चार्जशीटनुसार आत्महत्येच्या दिवशी जिया सूरजला सतत फोन करत होती. पण रात्री 10 वाजून 22 मिनिटांपर्यंत सूरजनं तिच्या एकाही कॉलचं उत्तर दिलं नाही त्यामुळे ती त्याच्या घरी गेली होती. तिनं सूरजच्या नोकराकडे त्याची चौकशी केली. त्यावर सूरजचा फोन ऑफ असून तो आपल्या वडीलांसोबत मिटिंगमध्ये असल्याचं त्याच्या नोकरानं तिला सांगितलं. त्यानंतर जिया काही काळ त्याच्या घराबहेर थांबली आणि मग तिथून निघून गेली.

घटस्फोटाच्या चर्चांनंतर आईसोबत एंजॉय करताना दिसली अभिनेता इम्रान खानची लेक

या सर्व प्रकारानंतर सूरजनं जियाला बोलवण्यासाठी एका माणसाला पाठवलं. पण तोपर्यंत जिया तिथून निघून आपल्या घरी गेली होती. सूरजनं तिला फोन करण्याचा प्रयत्न केला पण तिनं फोन उचलला नाही. यानंतर सूरजनं तिला 10 मेसेज केले. ज्यातील भाषा अतिशय वाईट होती आणि यात शिव्यांचाही वापर करण्यात आला होता. सूरजनं केलेल्या या सर्व मेसेज नंतर बरोबर 1 तासानं जियानं आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांच्या संशयाची सूई अद्याप सूरज पंचोलीवरच अडकलेली आहे. सूरजचे हे मेसेज वाचल्यानंतरच जियानं आत्महत्येचा पर्याय निवडला आणि जीवन संपवल्याचं म्हटलं जात आहे.

मलायकाच्या या हॉट फोटोंवर अर्जुन कपूरने दिली ही कमेंट

सलमान-कॅटची खास केमिस्ट्री, भारत सिनेमानिमित्त कतरिना कैफ EXCLUSIVE

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 08:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...