चाहता असावा तर असा! चाहत्याने सलमानसाठी केलं हे खास काम

चाहता असावा तर असा! चाहत्याने सलमानसाठी केलं हे खास काम

सलमान खानसाठी त्याचे चाहते काय करू शकतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्याचे चाहते प्रत्येकवेळी असं काही करतात की त्याला ही अनेकदा आश्चर्याचा धक्का बसतो.

  • Share this:

मुंबई, 03 जून- सलमान खानसाठी त्याचे चाहते काय करू शकतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्याचे चाहते प्रत्येकवेळी असं काही करतात की त्याला ही अनेकदा आश्चर्याचा धक्का बसतो. यावेळी दबंग खानच्या चाहत्याने सलमानचा आगामी भारत सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चक्क पूर्ण थिएटर बुक केलं. डेक्कन क्रोनिकलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आशीष सिंघल नावाच्या सलमानच्या चाहत्याने भारत सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी नाशिकमधील एक थिएटर पूर्ण बुक केलं.

चाहता असावा तर असा! या सुपरस्टारच्या काही मिनिटांच्या सीनसाठी चाहत्याने खर्च केले १ लाख रुपये

सलमान खानचा भारत सिनेमा ५ जूनला ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमानसोबत कतरिना कैफटी मुख्य भूमिका आहे. व्हीएफएक्सच्या मदतीने सिनेमात सलमानला तरूण आणि म्हातारं दाखवण्यात आलं आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या सिनेमातील कतरिना भूमिकेचं आधीच कौतुक होत आहे. सिनेमातले तिचे संवाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मलायकाच्या या हॉट फोटोंवर अर्जुन कपूरने दिली ही कमेंट

कतरिना कैफचं या सिनेमासाठी भरपूर कौतुक होत असलं तरी भारतसाठी ती काही पहिली पसंत नव्हती. कतरिनाआधी प्रियांका चोप्राला विचारण्यात आलं होतं. प्रियांकाने सिनेमाला होकारही दिला होता. मात्र लग्नामुळे तिने अचानक या सिनेमातून काढता पाय घेतला. यानंतर कतरिनाला विचारण्यात आले. कतरिनाने लगेच या सिनेमाला होकार देत सिनेमाला त्यांची नवीन कुमुद मिळाली.

GQ 100 Best Dressed Awards- कतरिना कैफचा हॉट लुक पाहिलात का?

First published: June 3, 2019, 9:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading