Home /News /entertainment /

पावनखिंड: बाजीप्रभूंच्या बलिदानाच्या इतिहासाबरोबर रायाजी-कोयाजीचा थरारक लढाही दिसणार

पावनखिंड: बाजीप्रभूंच्या बलिदानाच्या इतिहासाबरोबर रायाजी-कोयाजीचा थरारक लढाही दिसणार

पावनखिंडीतला लढा म्हटल्यावर छत्रपतींच्या बाजीप्रभू देशपांडे या शूर शिलेदाराची आठवण होते. पण त्यांच्याबरोबरच हा लढा यशस्वी करणारी दोन अजरामर नावं म्हणजे श्रीमंत कोयाजीराव बांदल आणि श्रीमंत रायाजीराव बांदल...

    मुंबई, 24 जानेवारी: शिवकालीन इतिहासातील (History of Maratha King chhatrapati shivaji maharaj) सुवर्णपान असणाऱ्या 'पावनखिंड' चा (Pawankhind) उल्लेख येताच बाजीप्रभू देशपांडेंचं (Bajiprabhu Deshpande) नाव पुढे येतं. त्यांच्या जोडीला आणखी दोन शूरवीरांची नावंही या लढ्यात महत्त्वपूर्ण होती. शिवचरित्रातील पावनखिंडीच्या अध्यायातील दोन अजरामर नावं म्हणजे श्रीमंत कोयाजीराव बांदल आणि श्रीमंत रायाजीराव बांदल... या दोन बांदल बंधूंचा थरारक लढाही पावनखिंड या चित्रपटाच्या (Pawankhind Marathi movie) निमित्ताने मोठ्या पडद्यावर येणार आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेतून पडद्यावर आलेल्या 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांनंतर 'पावनखिंड' हा तिसरा  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पावनखिंडीचा रक्तरंजित इतिहास सांगणाऱ्या या चित्रपटात कोयाजीराव आणि रायाजीराव या बांदल बंधूंनी दिलेल्या बलिदानाची आणि त्यांच्या शौर्याची गाथाही पहायला मिळणार आहे. हिरडस मावळातले हिरे हिरडस मावळामध्ये रायाजीराव बांदल आणि कोयाजीराव बांदल यांच्या रूपात स्वराज्याला जणू दोन हिरेच गवसले. शूरवीर, धाडसी, निडर, वचनाला जागणारे आणि राजांसाठी प्राणांची बाजी लावणारे असे कितीतरी गुण या बांदल बंधूंच्या अंगी ठासून भरले होते. त्या काळरात्री बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू यांच्यासह रायाजीराव बांदल यांनी आपल्या 300 कडव्या बांदल सेनेच्या साथीने घोडखिंड अडवून धरली आणि पराक्रमाची शर्थ करीत अखेरच्या श्वासापर्यंत गनिमांची वाट रोखून ठेवली. 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत अपूर्वाची एन्ट्री! समोर आला दमदार LOOK 'पावनखिंड' चित्रपटात बाजीप्रभूंनी दिलेल्या बलिदानाच्या निमित्तानं रायाजीराव-कोयाजीराव या दोन पराक्रमी बंधूंचा थरारक लढाही पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेते अजय पूरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली असून, अंकित मोहन यांनी रायाजीराव बांदल तर अक्षय वाघमारे यांनी कोयाजीराव बांदल यांची भूमिका साकारली आहे. तुम्हाला माहीत आहे का चित्रपटाच्या शुटींगनंतर अभिनेत्यांच्या कपड्यांचं काय होतं? ए.ए.फिल्म्स प्रस्तुत आणि आलमंड्स क्रिएशन्स निर्मित 'पावनखिंड' ची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. दिग्दर्शनासोबतच 'पावनखिंड' या चित्रपटाचं लेखनही दिग्पाल लांजेकरनं केलं आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात दिसणार असून, मृणाल कुलकर्णीही राजमाता जिजाऊ बनल्या आहेत. याखेरीज वैभव मांगले, हरीश दुधाडे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, सचिन भिलारे, बिपीन सुर्वे  आदी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. 18 फेब्रुवारीला 'पावनखिंड' चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
    First published:

    Tags: Chhatrapati shivaji maharaj, Marathi cinema, Marathi entertainment

    पुढील बातम्या